‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ कार्यक्रमामुळे पाच पंचरत्न नावारुपाला आले. प्रेक्षकांच्या मनावर त्यांनी अधिराज्य गाजवलं. या शोमधील सुमधूर आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करणारे गायक म्हणजे प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन, रोहित राऊत, आर्या आंबेकर व कार्तिकी गायकवाड. आता हे पाचही पंचरत्न संगीत क्षेत्रात मोठी कामगिरी करत आहेत. कार्तिकीही आता यशाच्या शिखरावर पोहोचली आहे. कामाबरोबरच ती खासगी आयुष्यातही अगदी सुखी आयुष्य जगत आहे. २०२०मध्ये तिने लग्न करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. त्यानंतर वर्षभरापूर्वी गरोदर असल्याचं कार्तिकीने सांगितलं. कार्तिकीने एका गोंडस मुलाला जन्म दिला. आता तिचा लेक एक वर्षाचा झाला आहे. (Kartiki gaikwad son birthday party)
कार्तिकीने काही दिवसांपूर्वीच लेकाच चेहरा दाखवला. गाणं गात तिने लेकाला सगळ्यांसमोर आणलं. खास अंगाई गीत गायलं. अंगाई गीतसाठी व्हिडीओ शूट केला. या व्हिडीओमध्ये पती रोनित पिसे व मुलासह ती दिसली. खास कपडे परिधान करत या सुखी कुटुंबाने सुंदर शूट केलं. कार्तिकीचा लेक अगदी उठून दिसत होता. आता कार्तिकीने तिच्या मुलाचा बर्थडे अगदी जोरदार साजरा केला.
आणखी वाचा – दीपिका कक्करला मोठा आजार, पोटात ट्युमर अन्…; रुग्णालयात अशा परिस्थितीत आहे अभिनेत्री, व्हिडीओ समोर
कार्तिकीने रिशांक असं मुलाचं नाव ठेवलं. रिशांकच्या नावाने कार्तिकी व रोनितने इन्स्टाग्राम अकाऊंटही सुरु केलं आहे. आता त्याच्या बर्थडे पार्टीचे फोटो समोर आले आहेत. कार्तिकीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे बर्थडेचे काही फोटो व व्हिडीओ शेअर केले. यामध्ये कार्तिकीने लेकासाठी अवाढव्य खर्च केलेला दिसत आहे. बॉलिवूड स्टाइल ही पार्टी होती. कार्तिकीने वेस्टर्न स्टाइल डिझायनर गाऊन परिधान केला होता. तर पती रोनितने ब्लेजर, सूट परिधान करणं पसंत केलं. लेकालाही सूटा-बुटात कार्तिकीने तयार केलं. कार्टून थीम आधारित डेकोरेशन करण्यात आलं होतं.
आणखी वाचा – अमृता खानविलकर आई होणार का?, नवऱ्याने बेबी प्लॅनिंगबाबत दिलं उत्तर, म्हणाला, “सुरुवातीला एक काळ होता की…”
विशेष म्हणजे रिशांकने छोट्या कारमधून वाढदिवसासाठी एन्ट्री केली. तो क्षण पाहून कुटुंबही अगदी भारावून गेलं होतं. कार्तिकीच्या माहेरची व सासरची मंडळीही सेलिब्रेशन करण्यात अगदी रमून गेले होते. चार लेयरचा कार्टून केक विशेष लक्ष वेधून घेत होता. रिशांकनेही त्याची ही पहिली बर्थडे पार्टी एन्जॉय केली. कार्तिकी व रोनितने मुलाच्या वाढदिवसासाठी धडपड करत सुंदर कार्यक्रम केला.