‘सारेगमपा लिटिल चॅम्प्स’ कार्यक्रमामुळे नावारुपाला आलेली गायिका म्हणजे कार्तिकी गायकवाड. कार्तिकीने गायन क्षेत्रात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. अगदी कमी वयात ‘सारेगमपा लिटिल चॅम्प्स’चं विजेतेपद तिने पटकावलं. त्यानंतर गायन क्षेत्रातील तिचा खरा प्रवास सुरु झाला. कार्तिकी आता कलाक्षेत्रातलं मोठं नाव आहे. आता ती नवं आयुष्य जगत आहे. तिने २०२०मध्ये लग्न करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. सुखी संसारामध्ये ती रमली. गेल्याच वर्षी कार्तिकीने गोंडस मुलाला जन्म दिला. ती आता आईपण एन्जॉय करत आहे. आता पहिल्यांदाच तिने लेकाचा चेहरा दाखवला आहे. कार्तिकीचा व्हिडीओ पाहून सोशल मीडियाद्वारे चाहते कौतुक करत आहेत. (kartiki gaikwad baby)
कार्तिकीने लेकाचा चेहरा दाखवण्यासाठी युनिक स्टाइल निवडली. मुलासाठी तिने खास गाणं प्रदर्शित केलं आहे. खास अंगाई गीत तिने तिच्या युट्युब चॅनलद्वारे प्रेक्षकांसमोर आणलं. या गाण्याच्या व्हिडीओद्वारे तिने मुलाला सगळ्यांसमोर आणलं आहे. व्हिडीओमध्ये कार्तिकीसह तिचा पती रोनित पिसेही दिसत आहे. कार्तिकी व रोनित मुलासह खेळत आहे. कार्तिकीचा लेक अगदी सुंदर दिसत आहे.
आणखी वाचा – मोठा बंगला, सहा बेडरुम आणि…; असं आयुष्य जगतो फराह खानचा कुक, एकूण संपत्ती आहे…
कार्तिकी गायकवाडच्या लेकाचा चेहरा समोर
‘अंगाई नीज बाळा’ हे कार्तिकीचं नवं गाणं आहे. रिशांक कार्तिकी रोनित पिसे असं कॅप्शन देत कार्तिकीने तिच्या लेकाचा चेहरा दाखवला. यावेळी तिघांनीही सुंदर थीम केली होती. पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. तसेच जिथे हे गाणं शूट करण्यात आलं ती थीमही पांढऱ्या रंगाचीच होती. गाण्याच्या सेटला साजेसं असं सगळं डिझाइन करण्यात आलं होतं. कार्तिकी व तिचा पती रोनितसाठी हा आनंदाचा क्षण होता. व्हिडीओ पाहून चाहतेही थक्क झाले.
आणखी वाचा – ‘दहावी-अ’ची टीम पहिल्यांदाच मुंबई जवळून पाहताना…; राणीची बाग ते मुंबई इंडियन्सबरोबर धमाल
पाहा व्हिडीओ
गोड आवाज गोड अंगाई, तुमचा मुलगा खूप गोड आहे, अतिशय सुंदर, कोणाची नजर लागू नये, आमच्या लहानपणाची आठवण झाली अशा शब्दांमध्ये कार्तिकीचं चाहत्यांनी कौतुक केलं. कार्तिकीने इन्स्टाग्राम पोस्टद्वारेही या गाण्याबाबत व तिच्या लेकाबाबत माहिती दिली. २०२०मध्ये कार्तिकी व रोनितचं थाटामाटात लग्न झालं. कार्तिकीचं लग्न म्हणजे सगळ्यांना सुखद धक्का होता. कार्तिकीने तिचं डोहाळेजेवणही अगदी शाही पद्धतीने केलं. आता आयुष्यातील एक नवा टप्पा ती नव्याने जगत आहे.