Hemant dhome on sankarshan karhade : ‘क्रांतीज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. गेल्या अनेक दिवसांपासून हा चित्रपट चित्रपटगृहात जम बसवून आहे. मराठी शाळांवर सडेतोडपणे भाष्य करणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. चित्रपटातील सगळ्याच कलाकारांच्या दमदार भूमिकांनी हा चित्रपट एका उंचीवर नेऊन ठेवला. चित्रपटातील प्रत्येक सीनच भरभरुन कौतुक झालं. मात्र आता पुन्हा एकदा हा चित्रपट एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आलेला पाहायला मिळत आहे. चित्रपटातील एका डिलीट केलेल्या सीनमुळे हा चित्रपट चर्चेत आला.
चित्रपटाचा दिग्दर्शक हेमंत ढोमे याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर हा डिलीट केलेला सीन नेमका कोणता होता हे पोस्ट केले. चित्रपटात संकर्षण कऱ्हाडे या अभिनेत्याची देखील भूमिका होती. मात्र चित्रपटात संकर्षण कुठेच दिसला नाही. शाळेच्या पटांगणात सगळ्यांना जागरूक करण्यासाठी किरण करत असलेला संकर्षणचा सीन या चित्रपटातून डिलीट करण्यात आला. आता हेमंतने स्वतःच हा सीन सोशल मीडियावर पोस्ट करत संकर्षणची जाहीर माफी मागितली असल्याचा पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – “लाडका भाऊ योजना…” भाऊच्या धक्क्यावर रितेशने दिव्या-राकेशला झापलं, म्हणाला, “स्वतःचा गेम…”
पोस्ट शेअर करत संकर्षण म्हणाला, “लिखाणातला माझा अत्यंत आवडता प्रसंग. पण काही कारणास्तव चित्रपटात ठेवता आला नाही. खूप खूप धन्यवाद संकर्षण आणि सॉरी. लवकरच काहीतरी छान करुया, तुझे खूप आभार. ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’. तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात उदंड प्रतिसादात सुरु”, असं म्हटलं. या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत हा सीन चित्रपटात असायला हवा होता असं म्हणत नाराजी व्यक्त केली.
व्हिडीओवर एका चाहतीने असं म्हटलं की, “तरीच म्हटलं की, चित्रपटाच्या सुरुवातीला संकर्षण कऱ्हाडे दादाचं नाव पाहिलं, पण कुठेच दिसला नाही. काय हेमंत ढोमे दादा, बाकीचे चित्रपट तीन-तीन तास असतात, आपला मराठी चित्रपट पण अजून अर्धा तास जास्तीचा असता तर अजून बघायला मज्जा आली असती”. तर आणखी एकाने कमेंट करत, “खूप छान लिहिला आणि सादर झाला होता हा प्रसंग.. चित्रपटात असायला हवा होता.. असो, बाकी चित्रपट उत्तम आहे”, असं म्हटलं.





