रविवार, जुलै 26, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘दशावतार’च्या गूढ कथेमागे चेहरा नक्की कोणाचा?, कोकणातील कला मोठ्या पडद्यावर झळकणार, फर्स्ट लूक समोर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 4, 2025 | 11:00 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Marathi Movie

'दशावतार'च्या गूढ कथेमागे चेहरा नक्की कोणाचा?, कोकणातील कला मोठ्या पडद्यावर झळकणार, फर्स्ट लूक समोर

Marathi Movie : सध्या मराठी सिनेविश्वात अनेक आशयघन चित्रपट रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. अशातच आता कोकणातील कलेवर आधारित म्हणजे दशावतारावर आधारित नवाकोरा चित्रपट रसिकांच्या भेटीस येणार आहे. कोकणाची खासियत म्हणजे दशावतार. कोकणातील प्रत्येकजण दशावतार पाहण्यासाठी वेडा आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. कोकणची ही संस्कृती आज जगभरात लोकप्रिय आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आता या कलेला मोठं करत एक नवा कोरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. हा चित्रपट म्हणजे दशावतार.

‘झी स्टुडिओज’ प्रस्तुत आणि ओशन फिल्म कंपनी व ओशन आर्ट हाऊस निर्मित ‘दशावतार’ या आगामी मराठी चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर झळकले असून या पोस्टरने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. काळसर रंगाचे रंगवलेले रौद्र रूप, लालसर डोळे आणि विलक्षण कटाक्ष, या सगळ्यातून चित्रपटात नेमकं काय पहायला मिळणारी याची उत्कंठा अधिकच वाढते आहे.

आणखी वाचा – विराट कोहलीबरोबरच्या अफेअरच्या चर्चांवर अखेर तमन्ना भाटिया स्पष्टच बोलली, म्हणाली, “फक्त एक दिवसासाठी…”

सुबोध खानोलकर लिखित व दिग्दर्शित ‘दशावतार’ हा चित्रपट कोकणातील प्राचीन दशावतारी परंपरा आणि रहस्यमय पार्श्वभूमी यांचं मिश्रण आहे. पोस्टरमधील चेहरा प्रेक्षकांना अस्वस्थ करतोय, मात्र त्याचवेळी उत्सुकता देखील निर्माण करतोय. हे दिलीप प्रभावळकरच आहेत का? असा प्रश्न पडतो आहे आणि ते नेमके या रुपात काय करणार आहेत याचे कुतूहल निर्माण करत आहे.

आणखी वाचा – एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होऊ शकतात ‘हे’ आजार, गंभीर समस्या अन्…

सध्या केवळ चेहऱ्याची एक झलक समोर आली असून त्यामागचं खरं रूप, त्याचा संदर्भ आणि कथा अजूनही गूढतेच्या पडद्यात दडलेली आहे. पोस्टर वरुन दिलीप प्रभावळकर यांची ही वेगळीच भूमिका असणार, याचा अंदाज येतोय पण नेमकी ही भूमिका काय असेल याची उत्कंठा आता अधिकाधिक वाढतेय. अर्थातच हे रहस्य १२ सप्टेंबरला रुपेरी पडद्यावरच उलगडेल.

Tags: dashavtarmarathi movienew movie
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Pach Futacha Bachchan Marathi Movie
Entertainment

‘पाच फुटाचा बच्चन’ चा दैदीप्यमान प्रवास : कीर्तन, संस्कृती आणि संघर्षाची प्रेरणादायी कथा

जुलै 25, 2026 | 2:00 pm
Shekhar Suman On Student Protest
Entertainment

तीन दिवस झोप नाही, रडत आहे आणि…; आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे प्रसिद्ध अभिनेत्याला दुःख, म्हणाला…

जुलै 25, 2026 | 12:45 pm
Eva grover husband hyder ali khan
Entertainment

दिग्दर्शकासह शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जुलै 25, 2026 | 11:00 am
Akanksha Chamola Gaurav Khanna Lock Upp 2
Entertainment

Lock Upp 2 : गौरव खन्नाची कुत्र्याशी तुलना करणं पत्नीला पडलं भारी, नेटकरी भडकले, म्हणाले, “घटस्फोट दे…”

जुलै 25, 2026 | 9:50 am
Next Post
Bharti Singh On Labubu Doll

लाबुबू डॉल घरात आल्यापासून वाईट अनुभव, भारती सिंगने थेट जाळली बाहुली, म्हणाली, "माझा गोला वाईट…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.