Bharti Singh On Labubu Doll : सध्या जगभरात लाबूबू डॉल ची क्रेझ जोरदार पसरलेली पाहायला मिळत आहेच. सध्याच्या काळात सर्वात महागड्या बाहुल्यांपैकी एक असलेल्या लाबूबूला बॉलिवूड सेलिब्रिटी देखील खरेदी करत आहेत. बरेचजण ही बाहुली घेऊन सोशल मीडियावर अभिमानाने मिरवत देखील आहेत. मात्र या बाहुलीला घेऊन अनेक चर्चाही होत आहेत. ज्या घरात ही बाहुली ठेवली आहे तिथे वाईट शक्तींचा वास असेल आणि त्यामुळे दुर्दैव येईल. इतकेच नाही तर काही लोक असेही म्हणत आहेत की, ही बाहुली प्रत्यक्षात एका प्राचीन सैतानाची दूत आहे. या बाहुलीबाबत अनेक चर्चा होत असल्या तरी सेलिब्रिटींसह या बाहुलीचे खास कनेक्शन आहे.
अशातच भारती सिंग आणि लाबूबू डॉलचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये भारती सिंग तिच्या लेकाच्या म्हणजेच गोलाच्या लाबूबू डॉलला जळताना दिसत आहे. जेव्हा भारतीने तिच्या मुलाला सांगितले की, ती लाबूबू डॉल जाळून टाकेल, तेव्हा तिचा मुलगा गोलाने सांगितले की, ती त्याची मैत्रीण आहे. त्यावर भारतीने त्याला सांगितले की, ती डॉल सैतान आहे.
आणखी वाचा – विराट कोहलीबरोबरच्या अफेअरच्या चर्चांवर अखेर तमन्ना भाटिया स्पष्टच बोलली, म्हणाली, “फक्त एक दिवसासाठी…”
भारती म्हणाली, “लाबूबू आल्यापासून गोला खूप खोडकर झाला आहे. सगळे म्हणाले आहेत की, मी अंधश्रद्धाळू आहे. जस्मिन, माझी बहीण असे सगळे म्हणतात की, ते सैतानाचे रूप आहे. ते जळतही नाही, ते तुझ्यामुळे जळत आहे गोला. कारण – तू खूप खोडकर आहेस.” असं ती या व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे. भारतीची ही कृती पाहून गोलाच्या आया आणि पती हर्ष लिंबाचियाही बघतच राहिले आहेत.
आणखी वाचा – ‘दशावतार’च्या गूढ कथेमागे चेहरा नक्की कोणाचा?, कोकणातील कला मोठ्या पडद्यावर झळकणार, फर्स्ट लूक समोर
व्लॉगमध्ये हर्ष लिंबाचिया म्हणाला, “हे लोक ते जाळण्याचा प्रयत्न करत आहेत; पण ते जळत नाहीये, मला वाटतं की, त्याचा आत्मा प्रतिकार करू लागला आहे. आज तो नाही वाचणार”. लाबूबू डॉल जाळल्यानंतर भारती पुढे म्हणाली, “तर मित्रांनो, लाबूबू जाळला गेला आहे. सैतान मेला आहे, सैतान नेहमीच पराभूत होतो”. भारतीच्या या व्हिडीओवर नेटकरीही प्रतिक्रिया देत आहेत.





