शनिवार, मे 30, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

योगिता चव्हाण व सौरभ चौगुलेचा घटस्फोट?, सोशल मीडियावरील एकत्र फोटो केले डिलीट, नक्की सत्य काय?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 28, 2025 | 4:36 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Yogita chavan and Sourabh chougule

योगिता चव्हाण व सौरभ चौगुलेचा घटस्फोट?, सोशल मीडियावरील एकत्र फोटो केले डिलीट, नक्की सत्य काय?

Yogita chavan and Sourabh chougule : मराठी सिनेसृष्टीत अशी बरीच कलाकार मंडळी आहेत ज्यांनी आजवर कलाविश्वातील जोडीदाराची निवड केली आहे. अनेकांनी साखरपुडा समारंभ, लग्न समारंभ उरकत प्रेमाची कबुली दिली. बऱ्याच जणांचे सुखाचे संसार सुरु असलेले पाहायला मिळाले, तर काहींनी वेगळे होण्यासारखा मोठा निर्णय घेतला. अशातच आता मराठी मालिका विश्वातील एका कलाकार जोडीच्या वेगळे होण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. एक दीड वर्षांपूर्वीच लग्नबंधनात अडकलेल्या या कपलच्या नात्यात आता दुरावा आल्याचं म्हटलं जात आहे. ही कलाकार जोडी म्हणजे अभिनेता सौरभ चौघुले आणि अभिनेत्री योगिता चव्हाण.

योगिता चव्हाण आणि अभिनेता सौरभ चौघुले यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगल्या आहेत. योगितानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन दोघांचे फोटो डिलीट केले तेव्हाच या चर्चा सुरु झाल्या. आता योगिताच्या अकाउंटवर सौरभबरोबरचा एकही फोटो पाहायला मिळत नाही आहे. फोटो डिलीट करण्यामागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही, असं असलं तरी चाहत्यांमध्ये कुजबुज सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – ‘वस्त्रहरण’कार गंगाराम गवाणकर यांचे निधन, मालवणी मनाच्या नाटककाराने ८६व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

View this post on Instagram

A post shared by Saorabh Rajnish Choughule (@mesaorabh)

सौरभने धनत्रयोदशीच्या दिवशी शेअर केलेल्या सोलो फोटोंच्या पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधलं. सौरभने शेअर केलेले हे फोटो गेल्या वर्षीच्या दिवाळीतील होते मात्र यावेळी त्याने योगिताबरोबर फोटो पोस्ट न करता एकट्याचेच फोटो पोस्ट केले आहेत. दिवाळीच्या शुभेच्छा देणाऱ्या पोस्टवर चाहत्यांनी सौरभकडे योगिताची विचारपूस केली. “योगिता आणि तुम्ही खूप दिवस झाले एकत्र दिसला नाहीत”, “तुझा डिवोर्स झालाय का?”, “बरेच दिवस झाले पाहून. सध्या कोणत्या चॅनलवर काम सुरु आहे. रिक्शावाली कशी आहे”,असे अनेक कमेंट केल्या आहेत.

आणखी वाचा – सतीश शाह यांच्या निधनानंतर पत्नी होतेय ट्रोल, गळ्यातील मंगळसूत्र पाहून नेटकऱ्यांनी टोकलं, म्हणाले, “तिने अजूनही…”

सौरभ आणि योगिताने ३ मार्च २०२४ रोजी ‘आयुष्यभराचा हमसफर’ असं कॅप्शन देत लग्नबंधनात अडकल्याची सुखद बातमी दिली. आता ही जोडी लग्नाच्या दीड वर्षांनी एकत्र दिसत नसल्याने चाहत्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. नक्की सत्य काय?, ते दोघे खरंच वेगळे झाले आहेत का याबाबत त्यांनी अधिकृतपणे काहीही सांगितलेलं नाही.

Tags: divorce newsSourabh chouguleyogita chavan
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Tumbadchi Manjula Makarand Anaspure
Entertainment

‘तुंबाडची मंजुळा’मधील मकरंद अनासपुरेंचा लूक समोर, अभिनेत्याचा साधू अवतार चर्चेत

मे 30, 2026 | 5:08 pm
Gurmeet Choudhary Debina Bonnerjee
Entertainment

अनेक गर्भपात, सरोगसीद्वारे लेकीचा जन्म…; लग्नाच्या ११ वर्षांनी सुप्रसिद्ध अभिनेत्रीची आई होण्याची धडपड, नवऱ्याकडून खुलासा

मे 30, 2026 | 2:00 pm
Star Pravah Latest News
Entertainment

तीन महिन्यांत आठ नवेकोरे कार्यक्रम; स्टार प्रवाह वाहिनीची मोठी घोषणा, दिग्गज कलाकार झळकणार

मे 30, 2026 | 12:30 pm
 Rekha and Amitabh Bachchan
Entertainment

अभिनेत्यासह संध्याकाळ एकत्र घालवायला सुप्रसिद्ध अभिनेत्रीची भलतीच मागणी, खलनायकाचा खुलासा

मे 30, 2026 | 11:29 am
Next Post
Tu Maza Kinara film

प्रेम, आपुलकी, कुटुंबाची ओढ आणि…; ‘तू माझा किनारा’चा भावनिक प्रवास ३१ ऑक्टोबरपासून सुरु, भूषण प्रधानचा जबरदस्त अभिनय

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.