गुरूवार, मे 22, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

डेकोरेशन, सरप्राईज अन्…; ‘असा’ साजरा झाला ऐश्वर्या नारकरांचा पन्नासावा वाढदिवस, तितीक्षानी शेअर केला खास व्हिडीओ

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 10, 2024 | 1:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Marathi Actress Titeeksha Tawde made a special celebration of Aishwarya Narkar 50th birthday in vanity van

चक्क व्हॅनिटीमध्येच साजरा केला ऐश्वर्या नारकरांचा ५०वा वाढदिवस, तितीक्षाने शेअर केली खास झलक

मराठी सिनेसृष्टीतील चर्चेत असणाऱ्या कपलपैकी एक म्हणजे नारकर कपल. ९० दशकापासून आपल्या उत्कृष्ट अभिनयाने अविनाश नारकर व ऐश्वर्या नारकर प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. या चिरतरुण कपलच्या अभिनयाचा जितका मोठा चाहता वर्ग आहे. अशातच अभिनेत्री ऐश्वर्या नारकरांनी त्यांचा ५०वा वाढदिवस साजरा केला. ऐश्वर्या यांचा जन्म ८ डिसेंबर १९७४ साली झाला. आस्क मी सेशन’मध्ये अभिनेत्रीने एका चाहत्याला वय आणि जन्मतारीख सांगितली होती. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जंगी सेलिब्रेशन करण्यात आलं होतं. याची खास झलक सोशल मीडियावर त्यांनी शेअर केली होती. (Aishwarya Narkar Birthday Celebration)

ऐश्वर्या नारकर सध्या झी मराठीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत काम करत आहेत. यावेळी वाढदिवसानिमित्त त्यांना मालिकेतीळ कलाकारांनीही खास शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्या वाढदिवसानिमित्त मालिकेच्या सेटवर कलाकारांनी खास सेलिब्रेशन करत त्यांना शुभेच्छा दिल्या. ऐश्वर्या यांच्या वाढदिवसानिमित्त मालिकेतील कलाकारांनी त्यांच्यासाठी खास सरप्राइज प्लॅन केलं होतं. याची झलक तितीक्षा तावडेने तिच्या युट्यूब चॅनेलद्वारे शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये तितीक्षा व मालिकेतील इतर कलाकारांनी ऐश्वर्या यांचा वाढदिवस कसा साजरा केला याचे खास पाहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Aishwarya Narkar (@aishwarya.narkar)

आणखी वाचा – अभिषेक-ऐश्वर्या दुसऱ्या अपत्याच्या विचारात?, रितेश देशमुखच्या कार्यक्रमात अभिनेत्याचा खुलासा, म्हणाला, “आराध्यानंतर…”

या व्हिडीओच्या सुरुवातीला “ऐश्वर्या ताईंचा पन्नासावा वाढदिवस आहे. त्यामुळे आम्ही त्यांचा वाढदिवसाचे खास प्लॅनिंग केलं आहे” असं म्हणते. त्यानंतर सेटवर जात सर्वांना ती “ऐश्वर्या यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना सरप्राइज द्यायचं आहे तर कुणी त्यांना काही सांगू नका” असंही म्हणते. त्यानंतर ते ठरलेल्या प्लॅनप्रमाणे त्यांच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करतात. यावेळी अभिनेत्री अमृता रावराणे त्यांच्यासाठी पूर्ण व्हॅनिटी सजवते. त्यानंतर ठरलेल्या प्लॅनप्रमाणे सर्वजण त्यांना सरप्राईज देतात. हे खास सेलिब्रेशन पाहून ऐश्वर्या नारकरही भारावून जातात. यावेळी अनेकजण त्यांना शुभेच्छाही देतात.

आणखी वाचा – “कोण आहे ही?”, प्राण्याची उमपा देत हिणावणाऱ्या नेटकऱ्याला विशाखा सुभेदारांचं चोख उत्तर, म्हणाल्या, “आई-बहीण…”

दरम्यान,  ‘या सुखांनो या’, ‘स्वामिनी’, ‘लेक माझी लाडकी’, ‘श्रीमंताघरची सून’ अशा एकापेक्षा एक लोकप्रिय मालिकांमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या नारकरांनी मध्यवर्ती भूमिका साकारल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्या मनोरंजनविश्वात सक्रिय आहेत. छोट्या पडद्यावर त्यांचा एक वेगळा चाहतावर्ग निर्माण झालेला आहे. उत्तम अभिनयाप्रमाणेच ऐश्वर्या नारकर त्यांच्या फिटनेससाठी सुद्धा ओळखल्या जातात. नियमित योगा करून फिट राहण्याचा सल्ला त्या सर्व चाहत्यांना देत असतात.   

Tags: aishwarya narkar 50th birthdayaishwarya narkar birthdayAishwarya Narkar Birthday Celebration
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Sankarshan Karhade Fan Moment
Entertainment

चाहते न भेटताच निघाले, पत्र लिहून ठेवलं अन्…; संकर्षण कऱ्हाडेच्या चाहत्यांच्या ‘त्या’ कृतीचं कौतुक, अभिनेत्याने भेटण्याची इच्छा केली व्यक्त

मे 22, 2025 | 10:32 am
Raja Shivaji Release Date Announced
Entertainment

मोठी घोषणा! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाची तारीख समोर, सहा भाषांत होणार प्रदर्शित

मे 21, 2025 | 6:27 pm
Vaishnavi Hagwane Death
Social

पैशांसाठी मारहाण, नणंद तोंडावर थुंकली अन्…; पुण्यातील घरंदाज कुटुंबातील सूनेची आत्महत्या, आई-वडिलांनी सांगितलं नेमकं काय घडलं?

मे 21, 2025 | 5:54 pm
Sunil Shetty on Pahalgam attack
Entertainment

पहलगाम हल्ल्यावर बॉलिवूड शांत का?, सुनील शेट्टी स्पष्टच बोलले, म्हणाले, “बोललं की शिवीगाळ होते आणि…”

मे 21, 2025 | 4:09 pm
Next Post
Rupali Ganguly Break Silence

"काही परिणाम होत नाही…", सावत्र मुलीबरोबरच्या वादावर रुपाली गांगुलीने सोडलं मौन, म्हणाली, 'वाईट वेळ…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.