‘बिग बॉस मराठी’च्या घरात खूप मोठी गोष्ट घडली असल्याचं पाहायला मिळत आहे. कॅप्टन्सी टास्क दरम्यान आर्याने निक्कीला कानाखाली लागवल्याने या शोने एक वेगळंच वळण घेतलेलं पाहायला मिळत आहे. सदर घटना झाल्यानंतर ‘बिग बॉस’ यांनी तात्काळ हा शो रद्द केला. आर्याने कानाखाली मारल्यानंतर निक्कीने लगेचच आरडाओरडा करत ‘बिग बॉस’कडे तक्रार करत न्याय मागितला. त्यावेळी ‘बिग बॉस’ यांनी सर्व स्पर्धकांना लिव्हिंग एरियामध्ये बोलावत एक मोठी सुनावणी केली. आता थेट ‘बिग बॉस’ या प्रकरणावर निर्णय देणार आहेत. (Surekha Kudachi On Bigg Boss Marathi 5)
‘बिग बॉस’ यांनी घोषणा करत आर्याला जेलमध्ये पाठवलं. यानंतर समोर आलेल्या प्रोमोमध्ये आज भाऊच्या धक्क्यावर आर्याची रितेश देशमुखने कानउघडणी केलेली दिसली. भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख आर्याला जेलमधून बाहेर बोलावतात. आणि असं म्हणतात की, “तुम्ही स्वतःला काय समजता. तुम्हाला राग आला तर तुम्ही कोणावरही हात उचलता. आर्या तुम्ही जे केलं १००% जाणून बुजून केलं होतं. मी ‘बिग बॉस’ला विनंती करतो की, कृपया त्यांनी आपला निर्णय सांगावा”.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi च्या घरातून नक्की कोण बाहेर जाणार? ‘त्या’ कृतीमुळे आर्या ठरणार का नॉमिनेशनची बळी?
जादुई टास्क दरम्यान निक्की व आर्यामध्ये झटापट झाली आणि रागाच्या भरात आर्याने निक्कीच्या कानशिलात लगावली. सदर प्रकरणानंतर आता मराठमोळ्या अभिनेत्री, लावणीक्वीन आणि ‘बिग बॉस मराठी’ची माजी स्पर्धक सुरेखा कुडची यांनी केलेलं भाष्य चर्चेत आलं आहे. यापूर्वीही सुरेखा यांनी पोस्ट शेअर करत ‘बिग बॉस’मधील न पटलेल्या मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. निक्कीची त्यांनी बरेचदा कानउघडणी केलेली पाहायला मिळाली. आता आर्याने निक्कीला मारल्यानंतर सुरेखा यांनी थेट ‘बिग बॉस’वरच आक्षेप घेतलेला पाहायला मिळाला.
आणखी वाचा – लालबागचा राजाच्या दर्शनावेळीचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री भडकली, म्हणाली, “योग्य वागणूक दिली नाही तर…”
सुरेखा कुडची यांनी पोस्ट शेअर करत असं म्हटलं की, “योग्य की अयोग्य?. काल आर्याने निक्कीच्या कानाखाली वाजवली असं म्हणत आहेत. खरंतर एपिसोड मध्ये असं काहीच क्लिअर दिसत नाही आहे. तो अरबाज बोंबलत सुटला डायरेक्ट थप्पड मारली आणि मग काय निक्कीने तेच उचलून धरलं. वास्तविक पाहता तसं कुठेही दिसलं नाही. बाकी काल जान्हवीचा गेम आवडला. पॅडी ही छान खेळला”.