शनिवार, जून 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“बलात्काराची शिक्षा फाशी!”, कोलकत्ता बलात्कार प्रकरणावर सुप्रसिद्ध अभिनेत्रीने मांडलं परखड मत, म्हणाली, “नवीन नियम करा…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 15, 2024 | 5:07 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
saie tamhankar on kolkatta rape case

स्वातंत्र्यदिनानिमित्त कोलकत्ता बलात्कार प्रकरणावर मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरची संतापजनक पोस्ट

वैद्यकीय महाविद्यालयात नाईट ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना सर्वत्र पसरली असून या घटनेने साऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. या चिंताजनक बातम्या साऱ्यांच्या मनाला चटका लावून जाणाऱ्या आहेत. या बातम्या कानावर येताच यंदाच्या स्वातंत्र्यदिनी संताप व्यक्त केला जात असल्याचं पाहायला मिळत आहे. पश्चिम बंगालमधील ही दुर्घटना ऐकल्याने अनेक कलाकार मंडळींनी सोशल मीडियावरुन यावर पोस्ट शेअर करत आक्षेप घेतलेला पाहायला मिळत आहे. अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्रीनेही इन्स्टाग्राम पोस्टद्वारे कठोर शब्दात संताप व्यक्त केला आहे. (Saie Tamhankar Post)

भिनेत्री सई ताम्हणकर हिने आजवर तिच्या बोल्ड व बिनधास्त व्यक्तिमत्वामुळे अनेकांच्या मनावर राज्य केलं आहे. विविधांगी भूमिका साकारत सईने तिचा असा स्वतःचा चाहतावर्गही तयार केला आहे. अभिनयाच्या जोरावर तर सईने साऱ्या रसिक प्रेक्षकांची मन जिंकली. याशिवाय हटके फोटोशूटमुळे ही ती नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावरही सई बऱ्यापैकी सक्रिय असते. बरेचदा सई न पटणाऱ्या मुद्द्यांवर सडेतोडपणे भाष्य करताना दिसते. सईने पश्चिम बंगालमध्ये घडलेल्या या संतापाजनक कृतीनंतर स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत भाष्य केलेलं पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – “गद्दार कोण?”, टास्कदरम्यान अरबाज-वैभवची वागणूक पाहून सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने विचारला जाब, तर सूरजचं कौतुक, म्हणाल्या, “काहीतरी शिजत होतं…”

सईने ही पोस्ट शेअर करत असं म्हटलं आहे की, “आजचा दिवस आपण स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करतो, मात्र यंदा तेवढा आनंद नाही. स्वातंत्र्य नाजूक गोष्ट आहे. त्याचे पालनपोषण आणि विश्वासाची आवश्यकता आहे. त्यामुळे आपण ते गृहीत धरता कामा नये. जेवढी असायला हवी तेवढी मी आनंदी नाही. आपण परिच्छेदच्या परिच्छेद लिहू, पोस्ट शेअर करु, राग व्यक्त करु पण हे सर्व केल्याने काही बदलेल का? आज आपण देशभक्तीपर गीते ऐकू आणि आयुष्य पुढे जात राहील. पुन्हा काहीतरी होईल, पुन्हा आपण काहीतरी लिहू, पुन्हा आयुष्य पुढे जात राहील”, असं मठातलं आहे.

आणखी वाचा – प्रेमात मिळाला मोठा धोका, गोलीगत सूरजने पहिल्यांदाच सांगितली प्रेमकहाणी, म्हणाला, “गोरापान मुलगा आवडला तर…”

यापुढे दुसरी एक स्टोरी शेअर करत तिने असंही म्हटलं आहे की, “या स्वातंत्र्यदिनी एक नवीन नियम करा ना, बलात्काराची शिक्षा फाशी. महिलांना महिला होण्यापासून स्वातंत्र्य द्या”, अशी विनंती सईने केली आहे.

Tags: marathi actressSaie Tamhankar Postsaietamhankar post
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 kanika maheshwari faced harassment
Entertainment

अश्लील इशारे, घाणेरडी नजर आणि…; १३व्या वर्षी अभिनेत्रीसह घडला वाईट प्रकार, म्हणाली…

जून 20, 2026 | 1:00 pm
Raghavendra Rao Viral Video
Entertainment

दिग्दर्शकाचा स्वतःवरचा ताबा सुटला?, अभिनेत्रीला जवळ ओढलं आणि…; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

जून 20, 2026 | 11:30 am
sunil grover sleeps on footpath
Entertainment

थेट फुटपाथवर चादर पसरून रात्र काढली, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला पाहून नेटकरी अवाक, म्हणाले

जून 20, 2026 | 9:40 am
 taarak mehta ka ooltah chashmah bagha
Entertainment

सीनदरम्यानच ढसाढसा रडू लागला बाघा, आईच्या आठवणीत पाणावले डोळे, निर्मात्यांनी सांभाळलं

जून 19, 2026 | 9:48 am
Next Post
Bigg Boss Marathi 5 daily update suraj chavan fight with arbaaz patel nikki tamboli janhavi killekar and vaibhav new promo

Bigg Boss Marathi : “तुला अजून हाणलं नाही", सूरजचा वैभवला दम, अरबाज-निक्कीवरही पडला भारी, नवा गेम पाहून सर्वच थक्क

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.