वैद्यकीय महाविद्यालयात नाईट ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना सर्वत्र पसरली असून या घटनेने साऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. या चिंताजनक बातम्या साऱ्यांच्या मनाला चटका लावून जाणाऱ्या आहेत. या बातम्या कानावर येताच यंदाच्या स्वातंत्र्यदिनी संताप व्यक्त केला जात असल्याचं पाहायला मिळत आहे. पश्चिम बंगालमधील ही दुर्घटना ऐकल्याने अनेक कलाकार मंडळींनी सोशल मीडियावरुन यावर पोस्ट शेअर करत आक्षेप घेतलेला पाहायला मिळत आहे. अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्रीनेही इन्स्टाग्राम पोस्टद्वारे कठोर शब्दात संताप व्यक्त केला आहे. (Saie Tamhankar Post)
भिनेत्री सई ताम्हणकर हिने आजवर तिच्या बोल्ड व बिनधास्त व्यक्तिमत्वामुळे अनेकांच्या मनावर राज्य केलं आहे. विविधांगी भूमिका साकारत सईने तिचा असा स्वतःचा चाहतावर्गही तयार केला आहे. अभिनयाच्या जोरावर तर सईने साऱ्या रसिक प्रेक्षकांची मन जिंकली. याशिवाय हटके फोटोशूटमुळे ही ती नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावरही सई बऱ्यापैकी सक्रिय असते. बरेचदा सई न पटणाऱ्या मुद्द्यांवर सडेतोडपणे भाष्य करताना दिसते. सईने पश्चिम बंगालमध्ये घडलेल्या या संतापाजनक कृतीनंतर स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत भाष्य केलेलं पाहायला मिळत आहे.

सईने ही पोस्ट शेअर करत असं म्हटलं आहे की, “आजचा दिवस आपण स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करतो, मात्र यंदा तेवढा आनंद नाही. स्वातंत्र्य नाजूक गोष्ट आहे. त्याचे पालनपोषण आणि विश्वासाची आवश्यकता आहे. त्यामुळे आपण ते गृहीत धरता कामा नये. जेवढी असायला हवी तेवढी मी आनंदी नाही. आपण परिच्छेदच्या परिच्छेद लिहू, पोस्ट शेअर करु, राग व्यक्त करु पण हे सर्व केल्याने काही बदलेल का? आज आपण देशभक्तीपर गीते ऐकू आणि आयुष्य पुढे जात राहील. पुन्हा काहीतरी होईल, पुन्हा आपण काहीतरी लिहू, पुन्हा आयुष्य पुढे जात राहील”, असं मठातलं आहे.
आणखी वाचा – प्रेमात मिळाला मोठा धोका, गोलीगत सूरजने पहिल्यांदाच सांगितली प्रेमकहाणी, म्हणाला, “गोरापान मुलगा आवडला तर…”
यापुढे दुसरी एक स्टोरी शेअर करत तिने असंही म्हटलं आहे की, “या स्वातंत्र्यदिनी एक नवीन नियम करा ना, बलात्काराची शिक्षा फाशी. महिलांना महिला होण्यापासून स्वातंत्र्य द्या”, अशी विनंती सईने केली आहे.