मंगळवार, जून 16, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आई झाल्यानंतर सई लोकूरने पहिल्यांदाच शेअर केला लेकीचा फोटो, इंटरनॅशनल ट्रीपची आठवणही सांगितली, म्हणाली, “या प्रवासात तिने…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 27, 2024 | 11:16 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sai lokur Daughter

आई झाल्यानंतर सई लोकूरने पहिल्यांदाच शेअर केला लेकीचा फोटो, इंटरनॅशनल ट्रीपची आठवणही सांगितली, म्हणाली, "या प्रवासात तिने..."

‘बिग बॉस’ मराठीमुळे अभिनेत्री सई लोकूर घराघरांत पोहोचली. सईने ‘बिग बॉस’ मध्ये प्रवेश केल्यानंतर ती विशेष चर्चेत राहू लागली. सोशल मीडियावरही सई बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. ‘बिग बॉस’ मराठी नंतर सई तिच्या वैयक्तिक कारणामुळे चर्चेत असते. ‘बिग बॉस’ नंतर सई कुठेच दिसली नाही. तिने सिनेसृष्टीतून काहीसा ब्रेकच घेतला. आणि ती लग्नबंधनात अडकली. सईने ३० नोव्हेंबर २०२० मध्ये तीर्थदीप रॉयबरोबर लग्न केले. लग्नानंतर सई तिच्या संसारात रमलेली पाहायला मिळाली.(Sai lokur Daughter)

लग्नाच्या तीन वर्षांनंतर १७ डिसेंबर २०२३ रोजी तिने गोंडस मुलीला जन्म दिला. सई सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. ती तिच्या लेकीबरोबरचे अनेक फोटो, व्हिडीओ शेअर करताना दिसते. लेकीबरोबर सई सध्या वेळ घालवताना दिसत आहे. नुकतीच सईने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. या पोस्टमध्ये सई, तिच्या नवऱ्याबरोबर व पतीबरोबर सिंगापूर दौऱ्याला गेली असल्याचं पाहायला मिळालं.

आणखी वाचा – दिशा-दामिनीच्या नव्या प्लॅनमुळे आदित्य अडचणीत, पारूलाही दिली धमकी, अहिल्यादेवींसमोर येणार का सत्य?

View this post on Instagram

A post shared by Sai Lokur (@sai.lokur)

सईने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पहिल्यांदाच लेकीबरोबरचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देत तिने लिहिलं आहे की, “ताशीची पहिली आंतरराष्ट्रीय सहल सिंगापूर होती आणि म्हणून हा फोटो माझ्या इन्स्टाग्रामवर असावा असं मला वाटतं. तिने सुट्टीचा मनसोक्त आनंद लुटला. ती फ्लाइटमध्ये खूप आरामात होती आणि प्रवासात ती अर्धावेळ झोपली होती. सिंगापूर व्हीलचेअर आणि स्ट्रोलर फ्रेंडली असल्यामुळे सिंगापूरमध्ये तिच्याबरोबर फिरणे खूप सोपे होते”.

आणखी वाचा – “प्रचंड वेदना आणि त्रास…”, मालिकांत काम करणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीला गंभीर आजार, म्हणाली, “मासिक पाळीदरम्यान…”

सईने पुढे लिहिलं, “जवळजवळ सर्व ठिकाणी नर्सिंग रूम होत्या, जिथे मी तिचे कपडे सहज बदलू शकत होते आणि तिला खायला देऊ शकत होते. तिला प्रवासात मजा आली. तिला तिच्या आजूबाजूच्या सर्व गोष्टी पाहण्याची आणि नवीन गोष्टी शोधण्याची खूप उत्सुकता होती. ती एकदाही रडली नाही किंवा दररोज इतके तास बाहेर असल्याने तिला कंटाळाही आला नाही. तिला हवं तेव्हा ती एखाद्या चांगल्या मुलीसारखी तिच्या स्ट्रोलरमध्ये झोपायची आणि इतर वेळी, आम्ही भेट दिलेल्या सुंदर ठिकाणांचा तिने मनसोक्त आनंद घेतला. त्यामुळे एकंदरीतच ही एक उत्तम सहल होती आणि ती नेहमी लक्षात राहील”.

Tags: entertainmentmarathi actresssai lokursai lokur daughter
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

sanchita ugale passed away
Entertainment

सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं टोकाचं पाऊल, घरीच गळफास घेत आत्महत्या, चित्रपटसृष्टीही हादरली

जून 15, 2026 | 2:42 pm
 India Women vs Pakistan Women
Women

भारतीय वाघिणींचा विजय! पाकिस्तानचा ६४ धावांनी उडवला धुव्वा, वर्ल्ड कपमध्ये पहिला विजय

जून 15, 2026 | 11:40 am
urmila matondkar ex husband nikaah
Entertainment

उर्मिला मातोंडकरच्या पूर्वाश्रमीच्या पतीने थाटला नवा संसार; घटस्फोटाच्या दोन वर्षांनी केलं लग्न, फोटो समोर

जून 15, 2026 | 11:00 am
Kap Bashi Trailer
Entertainment

नवरा नाहीतर जुळणार का सासू-सूनेची पत्रिका?, ‘कप बशी’ चित्रपटाच्या ट्रेलरने वाढविली उत्सुकता

जून 15, 2026 | 9:57 am
Next Post
Tharal Tar Mag Serial Update

सायली-अर्जुनकडून मोठी चूक, प्रियाने संधी साधत मारली बाजी, कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल मिळवली अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.