शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सई लोकूरच्या लेकीचा अन्नप्राशन सोहळा, परंपरा जपत सेलिब्रेट करत आहे प्रत्येक क्षण, घरातील सजावटीने वेधलं लक्ष

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 25, 2024 | 1:36 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sai Lokur Post

सई लोकूरच्या लेकीचा अन्नप्राशन सोहळा, परंपरा जपत सेलिब्रेट करत आहे प्रत्येक क्षण, घरातील सजावटीने वेधलं लक्ष

‘बिग बॉस मराठी’ या बहुचर्चित कार्यक्रमामुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे सई लोकूर. या शोमध्ये सईचे विविध पैलु पाहायला मिळाले. तिने या कार्यक्रमादरम्यान प्रेक्षकांचं उत्तम मनोरंजन केलं. तसेच स्वतःचा एक वेगळा चाहता वर्गही निर्माण केला आहे. मात्र या शोनंतर ती तिच्या संसारामध्ये रमली. ‘बिग बॉस मराठी’नंतर सईने लग्न करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. लग्नानंतर सई तिच्या संसारात रमली आणि तिने सिनेसृष्टीतून ब्रेक घेतला. (Sai Lokur Post)

२०२१मध्ये सईने तीर्थदीप रॉयबरोबर थाटामाटात लग्न केलं. तिच्या लग्नाची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली. यांनतर सई व तीर्थदीप यांनी आई-बाबा झाल्याचीही आनंदाची बातमी दिली. अभिनेत्रीच्या गरोदरपणातील फोटोशूटने साऱ्यांचं लक्ष वेधलं होतं. सईने गेल्या वर्षी १७ डिसेंबरला गोंडस मुलीला जन्म दिला. त्यानंतर काही दिवसांनी तिने मुलीचं बारस केलं. सईच्या मुलीचं नाव ताशी असं आहे. ताशीचा अर्थ समृद्धी आणि शुभ असा होता.

आणखी वाचा – दिव्यांग चाहत्याला बॉडीगार्डने ढकललं, नेटकऱ्यांनी नको नको ते सुनावल्यानंतर नागार्जुनने मागितली जाहीर माफी, नेमकं काय घडलं?

View this post on Instagram

A post shared by Sai Lokur (@sai.lokur)

सई तिच्या लेकीबरोबरचे अनेक फोटो, व्हिडीओ पोस्ट करताना दिसते. अद्याप सईने तिच्या लेकीचा चेहरा सर्वांसमोर आणला नाही आहे. त्यामुळे सगळ्यांना सईच्या लेकीला पाहण्याची उत्सुकता लागून राहिली आहे. सईच्या लेकीला आता सहा महिने झाले आहेत. सहा महिन्यानंतर लहान मुलांना अन्नप्राशन केलं जातं. आणि अन्न प्राशन कार्यक्रमही आयोजित केला जातो. सईनेही तिच्या लेकीचा हा अन्न प्राशन सोहळा आयोजित केला असल्याचं पोस्टद्वारे सांगितलं आहे.

आणखी वाचा – समुद्रात सर्फिंग करणं पडलं महागात, शार्कने केलेल्या हल्ल्यात सुप्रसिद्ध अभिनेत्याने गमावला जीव, कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर

सईने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये तिने तिच्या नवऱ्याबरोबरचा फोटो पोस्ट केला आहे. “ताशीचा अन्नप्राशन सोहळा. माझं बाळ आजपासून जेवू शकणार”, असं कॅप्शन देत तिने या सोहळ्यातील खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सई व तिचा नवरा पारंपरिक अंदाजात दिसत आहे. सई तिच्या लेकीच्या आयुष्यातील या खास दिवसासाठी खूपचं खुश असल्याचं दिसत आहे.

Tags: entertainmentmarathi actresssai lokursai lokur daughterSai Lokur Post
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Anushka sharma troll after banglore stampede
Entertainment

“खोटं रडू नकोस, इतके पैसे कमावले पण…”, बंगळूर चेंगराचेंगरीवर पोस्ट करताच अनुष्का शर्मा ट्रोल, नेटकऱ्यांचा संताप

जून 6, 2025 | 2:30 pm
Next Post
ubodh Bhave On His Fan

"यापुढे एक खुर्ची कायमची रिकामी…", चाहतीच्या निधनानंतर सुबोध भावेला दुःख अनावर, म्हणाला, "इरावती तुम्हाला…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.