सर्वच कलाकार हे त्याच्या अभिनयासोबतच सोशल मीडियावर त्याच्या हटके लूकने चाहत्यांना भुरळ घालतात. अश्यातच कायम सोशल मीडियावर सक्रिय असणारी अभिनेत्री म्हणजेच रिंकू राजगुरू. तिच्या सैराट या चित्रपटातील आर्ची या भूमिकेने तर चाहत्यांना वेड लावलं. त्यानंतर तिने मेकअप,आठवा रंग प्रेमाचा , कागर अश्या अनेक चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप पाडली.यासोबत सध्या ती तिच्या मनमोहक अदांनी सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना भुरळ घालते. तर नुकतंच तिने साडीतील काही फोटो शेअर केलेत.पण या फोटोपेक्षा आकाशने तिच्या या पोस्टवर केलेल्या कमेंटची चर्चा सर्वत्र रंगली.(Rinku Rajguru )
====
हे देखील वाचा-तेजश्रीची लंडनला निघाली स्वारी, नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस
====

सैराट या चित्रपटातून अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि अभिनेता आकाश ठोसर यांनी मराठी सिनेविश्वात पदार्पण केलं.ही जोडी पहिल्या चित्रपटातूनच प्रेक्षकांची लोकप्रिय जोडी झाली. सैराट नंतर ही जोडी झुंड या चित्रपटात देखील पाहायला मिळाली. रिंकू आणि आकाश यांना नेहमी आर्ची आणि परश्या या नावाने ओळखलं जातं.या दोघांमध्ये चांगली मैत्री असल्याचं यांच्या अनेक पोस्टमधून दिसून येतो.या फोटोंवरून यांच्यात नेमकी मैत्री आहे की प्रेम अशी चर्चा चाहत्यांमध्ये नेहमी रंगते, तर आता पुन्हा या चर्चेला उधाण आलं.

रिंकूने नुकतेच काही फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेत. या फोटोत तिने गुलाबी रंगाची साडी, त्यावर शोभेल अशी ज्वेलरी परिधान केली, पण तिच्या या लूकमधील हेअरस्टाईल आणि हातातील गुलाबाने तिच्या लूकची शोभा वाढवली.ती या लूकमध्ये फारच सुंदर दिसते, तिच्या या लूकची भुरळ सध्या चाहत्यांना पडली असून अनेक चाहत्यांनी मस्त, ब्युटीफुल,गुलाबाची कळी,पिंकू अश्या अनेक कमेंटस केल्या आहेत, पण यामध्ये सर्वात लक्षवेधी ठरणारी कमेंट म्हणजे आकाश ठोसरची. आकाश म्हणजे परश्या देखील आर्चीचा हा लूक पाहून तिच्या प्रेमात पडलाय. त्याने तिच्या या फोटोवर हार्ट डोळे असलेला ईमोजी शेअर केला आहे. तर त्याच्या या कमेंटवर अनेक चाहत्यांनी बेस्ट कपल, माझे राजा राणी,परश्या आर्ची आली रे आली असं म्हणत कमेंटचा पाऊस पाडलाय.तर यांच्यात नेमकं काय? हे खरंच कपल आहेत का? अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली.(Rinku Rajguru )

दरम्यान आकाश पुन्हा एकदा नागराज मंजुळे दिग्दर्शित घर बंदूक बिर्याणी या चित्रपटात एका मुख्य भूमिकेत झळकणार आहे.