बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : ढोल, ताशे, अन् पारंपारिक अंदाज…, परदेश दौऱ्यादरम्यान अमृता देशमुखने घेतलं बाप्पाचं दर्शन, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “नट्टा-पट्टा…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 21, 2023 | 12:20 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Amruta Deshmukh On Ganeshotsav

Video : ढोल, ताशे, अन् पारंपारिक अंदाज…, परदेश दौऱ्यादरम्यान अमृता देशमुखने घेतलं बाप्पाचं दर्शन, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, "नट्टा-पट्टा…"

भारतात, महाराष्ट्रात गणेशोस्तव हा सण धुमधडाक्यात साजरा केला जातो. गणेश चर्तुर्थीची अनेक जण आतुरतेने वाट पाहत असतात. सर्वसामान्यांपासून ते कलाकार मंडळींपर्यंत अनेकजण गणपतीसाठी उत्सुक असतात. गणपती बाप्पाच्या आगमनासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने देखावे, सजावट करत असतो. कलाकार मंडळींमध्ये तर गणेशोत्सवाचा उत्साह अधिक असलेला पाहायला मिळतो. बरेचदा कामानिमित्त या कलाकार मंडळींना सण साजरे करायला मिळत नाही. (Amruta Deshmukh On Ganeshotsav)

तर बरेचदा काही कलाकार हे कामानिमित्त परदेश दौरा करण्यातही व्यस्त असतात. मात्र आता गणेशतोत्सवाची धामधूम परदेशात ही पाहायला मिळतेय. परदेशी असलेले भारतीय गणेशोत्सव साजरा करताना दिसतात. अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने परदेशात गणेशोत्सवाचा आनंद घेतला आहे. ही मराठमोळी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून आहे अभिनेत्री अमृता देशमुख. अमृता ही सध्या नाटकांच्या दौऱ्यानिमित्त परदेश दौरा करण्यात व्यस्त आहेत.

आणखी वाचा – घरी गणरायाचे आगमन अन् मानाच्या गणपतींचे दर्शन, प्राजक्ता माळीची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत, म्हणाली, “भाचीचं गणपती स्तोत्र पठण…”

‘नियम व अटी लागू’ या नाटकाने रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. या नाटकांत अभिनेता संकर्षण कऱ्हाडे व अभिनेत्री अमृता देशमुख मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहेत. या नाटकाच्या दौऱ्यानिमित्त नाटकांची संपूर्ण टीम परदेश दौरा करण्यात व्यस्त आहे. परदेशात गेले असल्याने ते त्याच्या कुटुंबियांना मिस करत आहेत. शिवाय सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळतेय, त्यामुळे परदेश दौऱ्यानिमित्त गेलेले हे कलाकार गणेशोत्सवाला मिस करत आहेत.

आणखी वाचा – “मी खूप भाग्यवान समजतो” ‘या’ हिंदी चित्रपटात झळकणार संतोष जुवेकर, खुलासा करताना म्हणाला, “बाप्पाच्या कृपेने…”

मात्र यंदाचा गणेशोत्सव हा ते मिस जरी करत असले तरी परदेशातही त्यांना गणेशोत्सवाचा आनंद घेता आला आहे. अमृताने कॅन्सस येथील गणेशोत्सवानिमित्त काढलेले पारंपारिक अंदाजात काही फोटो शेअर केले आहेत, या फोटोंबरोबर तिने तिथल्या लोकांसोबत नाचतानाचा एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे. याखाली तिने म्हटलंय, “बाप्पा आगमन in Kansas City ????????, Thank You Kansasकर ..नट्टा-पट्टा करता आला..मजा आली..बाप्पाशी भेट झाली”. घरापासून दूर असलेले हे कलाकार घरच्यांना, इथल्या परंपरा, संस्कृतीला मिस करत असतात. यंदा अमृताशी तिच्या घरापासून दूर आहे, असं असलं तरी परदेशातही तिला गणपती बाप्पाच दर्शन घेता आलं आहे.

Tags: amruta deshmukhamruta deshmukh on ganeshotsaventertainmentniyam v ati lagoo
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Next Post
Adinath’s daughter suggest to bappa

“किती वेळा सांगितलं हो बाप्पा तुम्हाला...” आदिनाथ कोठारेच्या लेकीने दिला बाप्पाला सल्ला, म्हणाली, “…जपा जिवाला”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.