मंगळवार, मे 13, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

काळ्या रंगावरुन हिणावणाऱ्यांना पूजा सावंतने दिलं होतं सडेतोड उत्तर, म्हणालेली, “काही लोकांना…”

Ankita Shindeby Ankita Shinde
सप्टेंबर 8, 2023 | 12:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Pooja sawant talk about her skin color

Pooja sawant talk about her skin color

लाखो दिलों की धडकन, तरुणाईची लाडकी अभिनेत्री म्हणजेच पूजा सावंत. मराठी सिनेसृष्टीमधील गुणी अभिनेत्रींनमध्ये पूजा सावंतचं नाव आवर्जून घेतलं जातं. ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटातून पूजाने मराठी सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केले. अभिनयाबरोबर पूजा उत्तम नृत्यांगणा म्हणून ओळखली जाते. तिच्या नृत्याचेदेखील बरेच चाहते आहेत. ‘एका पेक्षा एका’ या डान्स रिऍलिटी शोमध्येही ती स्पर्धक म्हणून पाहायला मिळाली. अभिनय, नृत्याबरोबरच निवेदनाची धुराही पूजाने सांभाळली आहे. अशा वेगवेगळ्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या समोर येत असते.(Pooja sawant talk about her skin color)


आपल्या सोज्वळतेने पूजा प्रेक्षकांना आपलंस करून घेते. तिचं प्राण्यांवर खूप प्रेम आहे. अनेकदा तिने मुलाखतीत प्राण्यांविषयीचं प्रेम व्यक्त केलं आहे. सुबोध भावे यांच्या ‘बस बाई बस’ या कार्यक्रमात पूजाने हजेरी लावली होती. त्यात सुबोधने पूजाचा प्रवास जाणून घेतला. लहानपणीच्या गमंती, काही किस्से तिने या कार्यक्रमात शेअर केले.

View this post on Instagram

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant)


“सगळ्यांची लाडकी आणि सुंदर अभिनेत्री तू आहेस, तरीही काही वर्षांपूर्वी तुला तुझ्या दिसण्याच्या कॉम्प्लेक्स होता?” असा प्रश्न सुबोधने विचारला होता. यावर पूजा उत्तर देत म्हणाली, ”हो तू बरोबर बोलत आहेस. सगळेच नाही पण काही लोकांना सावळ्या रंगाबाबत कदाचित कधी कधी अडचण असते. शाळेत असताना माझं बरेचदा असं झालं होतं. जेव्हा मी अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध नव्हते तेव्हा अनेक प्रोजेक्ट्साठी मला नाकारण्यात आलं होतं. आम्हाला गोरी हिरोईन हवी आहे असं कारण मला देत होते’.

आणखी वाचा: …अन् भर कार्यक्रमात शाहरुख खाने केलं सुप्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीचं कौतुक, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “मला त्याच्याबरोबर…”

पुढे ती म्हणाली, ” आता मला माझ्या रंगावर, माझ्या दिसण्यावर गर्व आहे तो यापूर्वी कधीच नव्हता. असा काही अनुभव आल्यानंतर आपण स्वतःला ओळखतो त्यानंतरचा हा अभिमान आहे”. पूजा तिच्या अभिनयाच्या कौशल्यामुळे कायमच चर्चेत राहिली आहे. अनेकदा सोशल मीडियावर तिला ट्रोलही केलं जातं. त्या सर्व प्रश्नांना पूजा स्पष्टपणे उत्तर देताना पाहायला मिळते. ‘दगडी चाळ’ , ‘दगडी चाळ २’ या चित्रपटांमुळे पूजा सावंतचा चाहतावर्ग अधिकच वाढला आहे.

Tags: bus bai busdagadi chawlpooja sawantzee marathi
Ankita Shinde

Ankita Shinde

Latest Post

Ankita Walavalkar On Influencer
Entertainment

“फॉलोवर्सचा आकडा पाहून…”, सूरज चव्हाणचा ‘झापूक झुपुक’ न चालण्यावरुन कोकणहार्टेड गर्लचं भाष्य, म्हणाली, “त्याचे फॅन्स…”

मे 13, 2025 | 7:00 pm
abhijeet sawant on Marathi industry
Entertainment

“मराठी इंडस्ट्रीने कधी आपलसं केलंच नाही”, अभिजीत सावंतचा खुलासा, म्हणाला, “खूप दुखावलो…”

मे 13, 2025 | 6:22 pm
operation sindoor news
Entertainment

“गुटखा, जुगाराची जाहिरात करतात पण…”, कमांडो ऑफिसरचा बॉलिवूड सेलिब्रिटींना सवाल, ऑपरेशन सिंदूरला पाठिंबा न देण्यावरुन…

मे 13, 2025 | 4:56 pm
Swiggy Delivery Boy Viral Video
Social

बाळंतपणात बायको गेली, संसार एकट्यावरच अन्…; लेकीला घेऊन स्विगी डिलिव्हरी करणारा ‘बाप’

मे 13, 2025 | 4:51 pm
Next Post
kedar-bharat-ankush friendship

'ते' एक गाणं अन् केदार शिंदे व भरत जाधव यांच्यामध्ये झालं होतं भांडण, अंकुश चौधरीने मध्यस्ती केली आणि…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.