गुरूवार, जुलै 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मराठी रंगभूमीवर हास्याची नवी लाट घेऊन येणार ‘लाडकी विहीण योजना’, निर्मिती सावंत यांच्या नाटकाची उत्सुकता

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 26, 2026 | 12:15 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Nirmiti Sawant ladki vihin yojana Natak

मराठी रंगभूमीवर हास्याची नवी लाट घेऊन येणार ‘लाडकी विहीण योजना’, निर्मिती सावंत यांच्या नाटकाची उत्सुकता

Nirmiti Sawant ladki vihin yojana Natak : शासनाच्या योजना जनतेसाठी असतात, मात्र ही योजना थेट प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री निर्मिती सावंत मराठी रसिकांसाठी घेऊन येत आहेत ‘लाडकी विहीण योजना’. हसवण्याची, मन हलकं करण्याची आणि रोजच्या ताणतणावापासून क्षणभर विरंगुळा देणारी खास मनोरंजन योजना. योजनेचा उद्देश एकच भरपूर हशा आणि खळखळून हास्यविनोद. अष्टविनायक आणि पंचशील एण्टरटेन्मेंट निर्मित ‘लाडकी विहीण योजना’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, या नाटाकाचे लेखन प्रथमेश शिवलकर यांनी केले असून दिग्दर्शन राजेश देशपांडे यांचे आहे. या नावात ‘योजना’ असली तरी यात कुठलीही कागदपत्रं, अटी-शर्ती नाहीत; आहे फक्त खुसखुशीत विनोद, मिश्किल संवाद आणि मराठी माणसाच्या दैनंदिन आयुष्यातील गंमती-जमतींचं जिवंत चित्रण.

कौटुंबिक वास्तवावर हलक्याफुलक्या शैलीत भाष्य करत ही योजना प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचं काम करणार आहे. ‘ही कोणतीही शासकीय योजना नाही; ही पूर्णपणे रसिकांसाठीची मनोरंजन योजना आहे. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत कलाकारांनी हे स्पष्ट केलं. अष्टविनायक संस्थेचे निर्माते दिलीप जाधव यांच्यासोबत नाटक करताना अनेकवेळा त्यांच्याकडे दिग्दर्शन आणि निर्मितीची इच्छा व्यक्त केली होती. योग्यवेळी तुला संधी देईन असं आश्वासन त्यांनी दिलं होतं. आज या नाटकाच्या निमित्ताने मला ही संधी दिली त्यासाठी अष्टविनायक संस्थेचे आणि दिलीप दादांचे मनापासून आभार मानतो असं सांगत, अभिनेता प्रसाद ओक यांनी ‘लाडकी विहीण योजना’ हे नाटक रसिकांना दिलखुलास आनंद देईल असा विश्वास व्यक्त केला.

आणखी वाचा – रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्यात श्रीमंत कोण? दोघेही पैसे कोठून कमवतात? जाणून घ्या…

View this post on Instagram

A post shared by @ladki_vihin_yojana

निर्माता म्हणून हा आनंदाचा आणि समाधानाचा क्षण आहे. अष्टविनायक संस्था हे नावं आलं की, उत्तम आणि सकस हे अधोरेखित होतं. या नाटकाच्या निमित्ताने पंचशील एण्टरटेन्मेंट अष्टविनायक संस्थेशी जोडली जातेय याचा आनंद अभिनेता स्वप्नील जोशी ने व्यक्त केला. पहिलं सगळं नेहमीच खास असतं. एवढ्या सगळ्या मात्त्तबर मंडळींसोबत माझं पाहिलं व्यावसायिक नाटक येतयं याहून स्पेशल काही असू शकतं नाही, अशी भावना लेखक प्रथमेश शिवलकर यांनी बोलून दाखविली.

आणखी वाचा – कुणी तरी येणार येणार गं…; लोकप्रिय मराठी अभिनेता लग्नाच्या आठ वर्षांनी होणार बाबा, पत्नीचं थाटामाटात केलं डोहाळ जेवण

हसत-खेळत मनोरंजनाचा अनुभव देण्याचं आश्वासन देणाऱ्या या नाटकाच्या शुभारंभाचे प्रयोग गुरु ५ मार्च दु. ४.०० वा. प्रबोधनकार ठाकरे, बोरिवली, शुक्र ६ मार्च दु. ४. ०० वा. दीनानाथ नाट्यगृह, पार्ले शनि ७ मार्च दु. ४. ०० वा. यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा रवि ८ मार्च दु. १. ०० वा. यशवंतराव चव्हाण, कोथरूड येथे होणार आहेत. निर्मिती सावंत यांच्या सोबत स्नेहा रायकर, पुर्णिमा अहिरे-केंडे, अधोक्षज कऱ्हाडे, सुनील जाधव, मुकेश जाधव आदी कलाकार मंडळी यात आहेत. ‘लाडकी विहीण योजना’ नाटकाचे निर्माते दिलीप जाधव, प्रसाद ओक असून सहनिर्माते स्वप्नील जोशी, मंजिरी ओक, तृप्ती पाटील, संजय मेमाणे आहेत. नेपथ्य प्रदीप मुळ्ये तर संगीत अजित परब यांचे आहे. प्रकाश योजना सुनील जाधव यांनी केली असून गीतं क्षितीज पटवर्धन यांनी लिहिली आहेत. गायिका राधिका भिडे यांचा स्वरसाज आहे. वेशभूषा पुर्णिमा ओक तर रंगभूषा मदन गायकवाड यांची आहे.सूत्रधार प्रणित बोडके आहेत.

Tags: ladki vihin yojanamarathi dramanirmiti sawant
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Salman Khan Student Protest
Entertainment

विद्यार्थ्यांच्या निषेधाच्या समर्थनार्थ सलमान खाननेही उठवला आवाज, म्हणाला, “राजकीय रंग…”

जुलै 23, 2026 | 10:36 am
Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
Next Post
Chinmay Mandlekar Post

"बिल भरलं नाहीतर कनेक्शन कट", मराठी अभिनेत्याची फसवणूक, पत्नीला फ्रॉड कॉल आला आणि…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.