Chinmay Mandlekar Post : सध्याच्या डिजिटल युगात फसवुकीच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडताना दिसत आहेत. प्रगतीबरोबरच फसवणुकीच्या घटना वाढताना दिसत आहेत. काही गोष्टींचे अज्ञान यामुळे बरेचजण फसवणुकीला बळी पडताना दिसत आहेत. बरेचदा सोशल मीडियावर फसवणुकीची घटना शेअर करत काही मंडळी नागरिकांना सतर्क करत आहेत. अनेक कलाकार मंडळींनाही याची प्रचिती आली आहे. अनेक कलाकारांनीही त्यांच्याबरोबर फसवणुकीच्या घटना घडल्या असल्याचं म्हटलं आहे. अशातच अभिनेता चिन्मय मांडलेकरने नुकताच अशा फसवणूकीचा प्रकार समोर आणला आहे.
अभिनेता चिन्मय मांडलेकरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत फसवणुक झाली असल्याचं म्हटलं आहे. चिन्मयच्या पत्नीला गॅस कनेक्शन बिल भरलं नसल्याचा मॅसेज आला होता. पोस्ट शेअर करत त्याने फोनची व्हॉइस रेकॉर्डींगही ऐकवली आहे. त्यात समोरील व्यक्ती असं म्हणताना दिसत आहे की, “जानेवारी महिन्याचं १०६८ रुपये बिल तुम्ही भरलेले नाही. तुमचे बिल अपडेट दिसत नाही. व्हॉटस्अपला पाठवलेली फाइल डाऊनलोड करा. जर वेळेत पैसे भरले नाही तर पुढच्या ३० मिनिटांत आमची माणसं येऊन तुमचं कनेक्शन कट करतील”. हा फसवणूकीचा फोन असल्याचे चिन्मयच्या पत्नीच्या लक्षात येताच तिने देखील त्यांची चांगलीच शाळा घेतली.
A post shared by Chinmay Deepak Mandlekar (@chinmay_d_mandlekar)
चिन्मयची पत्नी म्हणाली, “मला कोणताच मॅसेज आलेला नाही”. शिवाय कनेक्शन कट करायला जी माणसं येणार आहेत त्यांनी पहिलं मला भेटा असं तिने फोनवर त्यांना बजावलं. तिच्या कठोरतेमुळे समोरील फसवणूक करणारा व्यक्ती थोडा घाबरला. त्यामुळे नेहा मांडलेकरच्या सुद्धा खरं खोटं नीट लक्षात आलं. हा व्हिडीओ सतर्कतेसाठी असल्याचं चिन्मयने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
आणखी वाचा – रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्यात श्रीमंत कोण? दोघेही पैसे कोठून कमवतात? जाणून घ्या…
चिन्मयने ही पोस्ट त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे. ज्यात त्याचे त्याच्या चाहत्यांनी आभार मानले आहेत. कारण, चिन्मयने पोस्ट शेअर करत त्यांना सतर्क केले आहे आणि सविस्तर माहिती दिली आहे.





