रविवार, एप्रिल 5, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

… म्हणून निर्मिती सावंत यांनी ‘सुपर डुपर’साठी मकरंद अनासपुरेंची घेतली मदत, म्हणाल्या, “भाषेचा आणि…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 30, 2026 | 4:15 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Nirmiti Sawant New Movie

… म्हणून निर्मिती सावंत यांनी 'सुपर डुपर'साठी मकरंद अनासपुरेंची घेतली मदत, म्हणाल्या, "भाषेचा आणि…"

Nirmiti Sawant New Movie : मराठी चित्रपटसृष्टीतील दमदार अभिनेत्री निर्मिती सावंत या पुन्हा एकदा त्यांच्या प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत. आगामी ‘सुपर डुपर’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये त्यांच्या तोंडी असलेला रांगडा लहेजा, संवादफेक आणि अस्सल गावाकडचा अंदाज प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. या चित्रपटात त्या गावातील एका खंबीर बाईची भूमिका साकारत आहेत. ट्रेलरमध्येच त्यांच्या व्यक्तिरेखेची झलक पाहायला मिळते. घर सांभाळणारी, परिस्थितीशी झुंज देणारी आणि कुटुंबाच्या अस्तित्वासाठी उभी राहाणारी स्त्री. विशेष म्हणजे, या भूमिकेला अधिक वास्तववादी बनवण्यासाठी निर्मिती सावंत यांनी खास मेहनत घेतली आहे.

ग्रामीण भाषेचा नेमका फ्लेवर, रांगडेपणा आणि बोलीभाषेतील बारकावे अचूक साधण्यासाठी त्यांनी मराठी सिनेसृष्टीत स्वतःची एक खास शैली निर्माण करणाऱ्या अभिनेता मकरंद अनासपुरे यांची मदत घेतली. त्यांनी स्क्रिप्ट पाठवून त्यांच्याकडून भाषेतील शब्द, वाक्प्रचार आणि लहेजा समजून घेतला, ज्यामुळे त्यांच्या व्यक्तिरेखेला खरेपणाची जोड मिळाली. याबद्दल निर्मिती सावंत म्हणतात, ”ट्रेलरमध्ये दिसतंच आहे की, मी एका गावाकडच्या बाईची भूमिका साकारतेय. तिचं आयुष्य, तिचं जगणं हे खूप वास्तव आहे. भाषेचा आणि लहेजाचा अचूकपणा यासाठी मी मकरंद अनासपुरेशी संपर्क साधला. अर्थात दिग्दर्शकाच्या परवानगीने. मकरंद त्याच भागातला असल्यामुळे, त्याच्या मार्गदर्शनामुळे त्या बोलीचा रांगडेपणा आणि नैसर्गिकपणा मला समजला. तिथले काही शब्द कसे वापरले जातात , हे कळले. त्यामुळे ही भूमिका अधिक खरी वाटते. अशीच जर मी ती भूमिका साकारली असती तर माझ्या आणखी एक भूमिकेपैकीच ती राहिली असती, मात्र आता ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल, असं मला वाटतं”.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून मृत्यू, शूटिंगदरम्यान घडली घटना, सहकलाकार म्हणाला…

चित्रपट निवडण्याबाबतही त्या अत्यंत विचारपूर्वक निर्णय घेतात. स्क्रिप्ट वाचताना त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात आणि त्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मिळाल्यानंतरच त्या भूमिका स्वीकारतात. प्रॉडक्शन हाऊस, दिग्दर्शक, लेखक, डीओपी अशा सर्व गोष्टींचा बारकाईने विचार करुनच त्या चित्रपटाची निवड करतात. नव्या कलाकारांमध्येही ‘स्पार्क’ दिसला, तर त्यांच्यासोबत काम करण्यास त्या नेहमी तयार असतात. नवीन वर्षात विविध सुपरहिट चित्रपटांमधून वेगवेगळ्या, लक्षवेधी भूमिका साकारत निर्मिती सावंत यांनी आपली अभिनयाची छाप अधिक गडद केली आहे. ‘सुपर डुपर’मधील त्यांची ही ग्रामीण भूमिका देखील प्रेक्षकांच्या मनात घर करेल, यात शंका नाही.

आणखी वाचा – ‘बिग बॉस’ विजेता दुसऱ्यांदा झाला बाबा, अभिनेत्याने इजिप्शियन पत्रकाराशी केलंय लग्न, आधीच सावत्र दोन मुली आणि…

‘झी स्टुडिओज’ प्रस्तुत, ‘नाईंटी नाईन प्रॉडक्शन्स’ आणि ‘सिद्धिविनायक प्रॉडक्शन्स’ निर्मित ‘सुपर डुपर’ हा कौटुंबिक मनोरंजनाचा महासोहळा येत्या ३ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. समीर आशा पाटील दिग्दर्शित ‘सुपर डुपर‘ या चित्रपटाचे विजय शिंदे आणि नरेश बोर्डे निर्माते आहेत. उमेश कुमार बन्सल, बवेश जानवलेकर प्रस्तुतकर्ता असून छायांकन संजय जाधव यांनी केले आहे.

Tags: nirmiti sawant
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Vishal Kotian Untold Story
Entertainment

विशाल कोटियनचे UNKNOWN FACTS; दगडी चाळीतला मुलगा ते ‘बिग बॉस’चा MASTERMIND

एप्रिल 5, 2026 | 11:00 am
Famous Marathi Actor Son Name Ceremony
Entertainment

मराठमोळ्या अभिनेत्याने थाटात साजरा केला लेकाचा नामकरण सोहळा; हटके अंदाजात सांगितलं मुलाचं नाव

एप्रिल 4, 2026 | 1:12 pm
Rashmika and Vijay Devarkonda New Update
Entertainment

रश्मिका होणार आई? चाहत्यांना दिली GOOD NEWS; ‘त्या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण

एप्रिल 4, 2026 | 12:05 pm
Piyush Mishra On Alcoholism
Entertainment

आईला नको नको ते बोलले, महिलांशी अश्लील संवाद केला; दारूच्या नशेत अभिनेत्याच्या आयुष्याची लागलेली वाट, म्हणाले…

एप्रिल 4, 2026 | 11:00 am
Next Post
gayatri datar wedding

अभिनेत्री गायत्री दातारची लगीनघाई, पहिल्या केळवणाचा व्हिडीओ समोर, भाऊ कदम, गौरीसह अनेक कलाकार…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.