सोमवार, सप्टेंबर 7, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

वयाच्या ४४ व्या वर्षी मराठी अभिनेत्रीने केलं दुसरं लग्न, साधेपणाने पार पाडला विवाहसोहळा, पतीही आहे कलाविश्वात सक्रिय

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 7, 2026 | 10:08 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Nandita Patkar Second Marriage photo

वयाच्या ४४ व्या वर्षी मराठी अभिनेत्रीने केलं दुसरं लग्न, साधेपणाने पार पाडला विवाहसोहळा, पतीही आहे कलाविश्वात सक्रिय

Nandita Patkar Second Marriage photo : सध्या मराठी सिनेविश्वातून कलाकार मंडळी आनंदाची बातमी देत आहेत. एकामागोमाग एक कलाकार लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच अपूर्वा गोरे आणि अंशुमान जोशी ही कलाकार जोडी थाटामाटात लग्नबंधनात अडकली. तर गौरव मोरेने प्रियांका कारेकरसह गुपचूप लग्न केलं. थेट त्याच्या नव्या घराच्या गृह्प्रवेशावेळी त्याचं लग्न झालं असल्याची बातमी समोर आली. यानंतर आता सिनेविश्वातून आणखी एका अभिनेत्रींच्या लग्नाची बातमी समोर आली आहे. मराठी चित्रपटसृष्टी आणि मालिका विश्वात आपल्या सहजसुंदर अभिनयानं प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री नंदिता पाटकर सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. वयाच्या ४४ व्या वर्षी नंदिताने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. अत्यंत साधेपणाने नंदिताने लग्न केले आहे.

नंदितानं पुन्हा एकदा आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे. नाट्य दिग्दर्शक विपुल महागावकर यांच्याशी तिने लग्नगाठ बांधली आहे. दोघांच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नंअनेक कलाकारांनी शुभेच्छा देत दोघांचे फोटो पोस्ट केले आहेत. नंदिता आणि विपुल यांच्या लग्नाच्या या फोटोंवर चाहत्यांनी, नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्रीने अचानक घेतलेला हा लग्नाचा निर्णय अनेकांना सुखद धक्का देणारा ठरला आहे.

आणखी वाचा – “काळा नायक नाही चालत”, नायक होण्याच होतं स्वप्न, मराठी अभिनेत्याची न ऐकलेली बाजू, म्हणाला, “नोकरी नसल्याने…”

View this post on Instagram

A post shared by Itsmajja Marathi (@itsmajja.marathi)

‘पै पैशाची गोष्ट’ आणि ‘उध्वस्त धर्मशाळा’ सारख्या दर्जेदार नाटकांच्या माध्यमातून नाट्य दिग्दर्शक विपुल महागावकरने आपली ओळख निर्माण केली. विपुल यांच्या ‘ते’ या समलैंगिकतेवर आधारित पहिल्या एकांकिकेला राज्यस्तरावर द्वितीय पारितोषिक मिळालं होतं. तर २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘एलिझाबेथ एकादशी’ या चित्रपटानं नंदिताला एक विशेष ओळख मिळाली. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं आणि त्यांना फिल्मफेअर मराठी पुरस्कारासाठी नामांकनही मिळालं. त्यानंतर नंदिताने काही मागं वळून पाहिलं नाही. ‘खारी बिस्किट’, ‘बाबा’, ‘लालबागची राणी’ आणि ‘पाणी’ या चित्रपटांमधून नंदिताने अभिनयाची छाप उमटवली.

Tags: marathi actressnandita patkarSecond Marriage photo
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Next Post
Suraj Chavan Wife Pregnant

लग्नाच्या चार महिन्यांनी सूरज चव्हाण होणार बाबा?, पत्नीचे बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे फोटो व्हायरल, नेमकं सत्य काय?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.