namrata sambherao funny reel : बॉक्स ऑफिसवर सध्या धुरंधर चित्रपटाची हवा पाहायला मिळत आहे. अल्पावधीतच धुरंधर या चित्रपटाने बक्कळ कमाई करत चांगलाच गल्ला जमवला. या चित्रपटाच्या कथानकाने रसिकांच्या मनावर राज्य केलं. अनेक कलाकार मंडळीही धुरंधर चित्रपट पाहून चित्रपटाचे कौतुक करताना दिसत आहेत. सोशल मीडिया पोस्ट शेअर करत ते व्यक्त होताना दिसत आहेत. चित्रपटाच्या कथेबरोबर, कलाकारांबरोबर चित्रपटातील गाणीही ठेका धरायला भाग पाडत आहेत. इतकंच नाहीतर अक्षय खन्नाच्या FA9LA गाण्यावर रील व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत.
अक्षय खन्नाच्या FA9LA गाण्याची भुरळ आता मराठी कलाकारांनाही पडली आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावनेदेखील अक्षय खन्नाच्या FA9LA गाण्यावर रील व्हिडीओ बनवला आहे. नम्रताचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कारण नुसत्या डान्स स्टेप न करता तिचा नेहमीप्रमाणे मॅडनेस या रीलमध्ये पाहायला मिळत आहे. या रील व्हिडीओमध्ये नम्रतासोबत प्रथमेश शिवलकर दिसत आहे. महाराष्ट्राची हास्यजत्राचा नवा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यासाठी कलाकारांची तयारीही सुरु आहे.
A post shared by Namrata Yogesh Sambherao (@namrata_rudraaj)
यादरम्यानच नम्रता आणि प्रथमेशने मजेशीर रील बनवला आहे. व्हिडीओमध्ये सुरुवातीला ते नाचताना दिसत आहेत. त्यानंतर नम्रता बाजूच्या भिंतीवर जाऊन आपटते. आणि मग स्वतःचं हसायला लागते. “‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चं शूट सुरु झालं आहे. madness तर झालाच पाहिजे. Partner in crime प्रथमेश शिवलकर. ५ जानेवारी पासून पाहायला विसरु नका सोमवार मंगळवार रात्री ९ वाजता सोनी मराठीवर”, असं कॅप्शन देत अभिनेत्रीने हा रील व्हिडीओ शेअर केला आहे.





