सोमवार, सप्टेंबर 7, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रितेश देशमुखवर जीवापाड प्रेम करते त्याची खऱ्या आयुष्यातील पत्नी, वाढदिवसानिमित्त शेअर केली रोमँटिक पोस्ट, म्हणाली, “आपण आनंदी कसे…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 17, 2025 | 2:57 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
genelia deshmukh riteish genelia

रितेश देशमुखवर जीवापाड प्रेम करते त्याची खऱ्या आयुष्यातील पत्नी, वाढदिवसानिमित्त शेअर केली रोमँटिक पोस्ट, म्हणाली, “आपण आनंदी कसे…”

genelia deshmukh riteish deshmukh : मराठी अभिनेता रितेश देशमुखचा आज वाढदिवस आहे. सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांकडून यंदाच्या त्याच्या वाढदिवसाला शुभेच्छांचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे. यादरम्यान, रितेशच्या वाढदिवसानिमित्त त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलिया देशमुखची पोस्ट साऱ्यांचं लक्ष वेधून घेताना दिसली. जिनिलियाने पोस्ट शेअर करत रितेशसाठी प्रेम व्यक्त केलं. जिनिलिया आणि रितेश देशमुखची जोडी संबंध महाराष्ट्रात दादा-वहिनी म्हणून ओळखली जाते. रितेश-जिनिलियाचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावरही ही जोडी नेहमीच सक्रिय असलेली पाहायला मिळाली आहे. एकमेकांबरोबरचे फनी व्हिडीओ ते नेहमीच शेअर करतात.

आता वाढदिवसाचे औचित्य सध्या जिनिलीया पोस्ट शेअर करत रितेशला म्हणते, “My Dearest. मला माहीत आहे की, आम्हाला गेली अनेक वर्षे ओळखणाऱ्या प्रत्येकाला असं वाटतं की, लग्नाला इतकी वर्षे होऊनही आम्ही एकमेकांबरोबर तेवढेच आनंदी कसे काय असतो. आमचं नातं इतकं अतूट कसं? पण, आज याचं उत्तर मी सर्वांना सांगणार आहे याचं कारण आहेस ‘तू’! हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं आहे”. जिनिलीयाने त्यांच्या सुखी संसाराचं क्रेडिट रितेशला देत ही पोस्ट वाढदिवसानिमित्त केली आहे.

आणखी वाचा – ‘धुरंधर’च्या गाण्यावर नम्रता संभेरावचा Madness, नाचताना भिंतीवर जाऊन आदळली अन्…; व्हिडीओ व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

“तू माझं प्रेम आहेस, तू माझ्या आयुष्यात आलास हे माझं भाग्यच आहे. तू मला हसवतोस. कधी माझ्या डोळ्यातून अश्रू आले तर ते तू पुसतोस. रितेश तू प्रत्येकाला आपलंसं करुन घेतोस. तुझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाचं हेच म्हणणं आहे. माझ्याबद्दल सांगायचं झालं तर, माझ्या पाठिशी तू २४ तास, आठवड्याचे सातही दिवस खंबीरपणे उभा असतोस. अजून काय हवं? ज्याचं मन सोन्यासारखं आहे अशा व्यक्तीकडून तुम्हाला पाठिंबा मिळतोय यापेक्षा दुसरं सुख नाही. तुला माहिती आहे का मी दररोज, प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक सेकंदाला तुझ्यासाठी कोणतंही सेलिब्रेशन करेन. कारण, तू यापेक्षा खूप काही डिझर्व्ह करतोस. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा My Heartbeat! माझं हृदय तुझ्याकडे आहे आणि ते कायम तुझ्याकडेच जपून ठेव”, अशी रोमँटिक पोस्ट शेअर केली आहे.

Tags: entertainmentgeneila deshmukhgenelia deshmukh
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Next Post
krantijyoti vidyalaya marathi madhyam Trailer

शाळेच्या मैदानात परतले चित्रीकरणाचे दिवस, ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ चा ट्रेलर अनावरण सोहळा नागांव येथे संपन्न

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.