महाराष्ट्राला लाभलेल्या महान विभूतींपैकी एक ठरलेले व्यक्तिमत्व म्हणजे कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे. ‘जय जय महाराष्ट्र माझा..’ या अजरामर गीताचे निर्माते साहिर साबळे यांच्या जीवनावर आधारित शाहीर साबळे हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शाहीर साबळे यांचे नातू आणि मराठी चित्रपट सृष्टीतले प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे या चिञपटाची निर्मित करत असून शाहीर साबळे यांची भूमिका अभिनेता अंकुश चौधरी साकारणार आहे.(Lata Mangeshkar Maharashtra Shahir)

लोकचळवळीत मोठा सहभाग असल्याने शाहीर साबळे यांचा बाळासाहेब ठाकरे, साने गुरुजी, लता मंगेशकर यांच्याशी चांगले संबंध होते. त्यामुळे साबळे यांच्या आयुष्यात असणारी यांची भूमिका ही मोठ्या पडद्यावर पाहणं उत्सुक ठरणार आहे.तर आता चित्रपटातील इतर पात्रांबद्दल माहिती समोर येत आहे. महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातील लता मंगेशकर यांचं महत्वाचं पात्र हरहुन्नरी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे साकारणार असल्याची चर्चा रंगली आहे. तर इतर भूमिका अजून गुलदस्त्यात आहेत.
====
हे देखील वाचा- बिग बॉस मध्ये भांडणारे दोन खेळाडू दिसणार एकत्र ‘या’ सिरीज मध्ये दिसणार एकत्र
====
गाणकोकिळा, भारतरत्न लता मंगेशकर यांनी त्यांच्या मधुर आवाजात गायलेल्या प्रत्येक गीताला अमरत्वाचा दर्जा प्राप्त झाला आहे. त्यांनी गायलेल्या प्रत्येक गाण्याला जगभरातून भरभरून प्रेम दिले जाते. तर हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री मृण्मयी ने या आधी चंद्रमुखी, मोकळा श्वास, नटसम्राट अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.(Lata Mangeshkar Maharashtra Shahir)

चित्रपटाच्या विविध बाजू(Lata Mangeshkar Maharashtra Shahir)
महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटात अभिनेता अंकुश चौधरीला शाहीर साबळे यांच्या भूमिकेत पाहणं रंजक ठरेल तर सना शिंदे शाहीर साबळेंच्या पत्नीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. सना शिंदे ही दिग्दर्शक केदार शिंदे यांची मुलगी असून ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटातून ती सिनेविश्वात पाऊल टाकण्यास सज्ज झाली आहे. यांच्यासह चित्रपटात अतुल काळे, अमित डोलावत हे कलाकारही झळकणार आहेत. ‘बहरला हा मधुमास…’ या गाण्यात सनाचा एक आगळावेगळा अंदाज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय.
चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी अजय-अतुल यांनी सांभाळली आहे. ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाची प्रस्तुती ‘एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट’ आणि केदार शिंदे प्रॉडक्शन्सची आहे. चित्रपटाचे निर्माते म्हणून संजय छाब्रिया आणि बेला केदार शिंदे यांनी बाजू सांभाळली आहे. येत्या २८ एप्रिलला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे.