मराठी मालिका विश्वात अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात घर करणारी मालिका ठरलीये. मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलेलं दिसतंय. मालिकेतील राज आणि कावेरीची भूमिका पार पाडणारे अभिनेता विवेक सांगळे, अभिनेत्री तन्वी मुंडले या नव्याकोऱ्या जोडीने प्रेक्षकाना वेड लावलं आहे. या नव्या जोडीच्या सोबतीला साथ लाभली ते अनुभवी अभिनेत्री निवेदिता सराफ यांची. ज्यांच्या अभिनयातील अनुभवाचा वापर पुरेपूर त्यांच्या अभिनयातून अनुभवता येतो. तर बऱ्याच संकटानंतर मालिकेमध्ये आता अखेर रत्नमाला या आजारातून बऱ्या होऊन घरी परतल्या आहेत. पण एक नवीन संकट रत्नमाला आणि राज कावेरीवर आलं आहे.(Raj Kaveri)
रत्नमाला यांचा जीव वाचवण्यासाठी आवश्यक असणारी किडनी वैदेहीने दिल्याचं मालिकेत दाखवण्यात आलं. पण वैदेहीने त्यामागचा हेतू स्पष्ट करत मला राज नाही तर संपूर्ण प्रॉपर्टी माझ्या नावावर हवी आहे अशी मागणी केली तरच मी किडनी डोनेट करेन असं सांगितलं.तर आईचा जीव वाचवण्यासाठी कोणताही विचार न करता राज ने सगळी प्रॉपर्टी वैदेहीच्या नावावर करून टाकली तेव्हा वैदेही ने रत्नमाला यांना किडनी डोनेट करून त्यांचा जीव वाचवला.

वैदेहीच्या अटीनुसार राज ने सगळी प्रॉपर्टी वैदेहीच्या नावावर केल्यामुळे आता माहेरच्या चहाचा आणि प्रॉपर्टीचा आर्धा हिस्सा सानियाच्या मालकीचा झाला आहे. त्यामुळे राज आणि कावेरी यांच्या पुढे काय करायचं हा प्रश्न उभा राहिला आहे. रत्नमाला यांच्या आजारपणाचा फायदा घेत सानियाने मांडलेला डाव यशस्वी होणार का? राज आणि कावेरी या संकटावर कशा प्रकारे मात करणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक दिसत आहेत.(Raj Kaveri)
=====
हे देखील वाचा- बिग बॉस मध्ये भांडणारे दोन खेळाडू दिसणार एकत्र ‘या’ सिरीज मध्ये दिसणार एकत्र
=====
मालिका विश्वात येणाऱ्या प्रत्येक मालिकेवर प्रेक्षक भरभरून प्रेम करतो. काही मालिकांकडे शिकण्याच्या दृष्टिकोनाने बघून तर काही जण केवळ मनोरंजनाच्या दृष्टीने पाहतात. अल्पावधीत प्रसिद्धीस उतरलेल्या मालिका जिव्हाळ्याचा विषय बनतात. त्यामुळे त्यातील एखादया पात्राचा निरोप ही प्रेक्षकांना पाहवत नाही. तर आता मालिकेत नक्की पुढे काय घडणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.