मराठी मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकार मंडळी ही आपल्या चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात असतात. सोशल मीडियाद्वारे ते आपले सुख:दुख चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. एखादी आनंदाची बातमी असो किंवा एखादा दु:खद प्रसंग असो, सोशल मीडियाद्वरे ही मंडळी कायमच व्यक्त होताना दिसतात. त्याचबरोबर त्यांना असणाऱ्या एखाद्या आजाराबद्दलची माहितीही ते सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात., अशातच एका मराठी अभिनेत्रीची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अभिनेत्री आहे कृतिका गायकवाड हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे आणि या पोस्टद्वारे तिने तिला झालेल्या एका गंभीर आजाराविषयीची माहितीही दिली आहे. या आजारामुळे कृतिकाचं पोट फुगलेलं दिसत आहे. मात्र आपण गरोदर नसून आपल्याला एक आजार झाला आहे असं सांगणारी एक पोस्ट तिने शेअर केली आहे. काही दिवसांपूर्वी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असल्याचा एक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला होता आणि आता कृतिकाने तिचे पोट फुगलेला एक व्हिडिओ शेअर केला आहे.
हा व्हिडीओ शेअर करत तिने असं म्हटलं आहे की, “नाही मी गरोदर नाही, हे गर्भाशयाचे फायब्रॉइड्स आहेत जे वर्षानुवर्षे विकसित झाले आहे. फायब्रॉईड म्हणजे गर्भाशयातील गाठ. ही गाठ म्हणजे कर्करोग नाही. फायब्रॉइड असलेल्या सर्व महिलांमध्ये ही लक्षणे नसतात. ज्या स्त्रियांना लक्षणे दिसतात त्यांना सहसा फायब्रॉइड्ससह जगणे कठीण वाटते. काहींना वेदना होतात आणि मासिक पाळीत जास्त रक्तस्त्राव होतो. यातील काही वाढ डोळ्यांनी पाहण्यास खूपच लहान आहेत”.
आणखी वाचा – आई झाल्यानंतर कार्तिकी गायकवाडची पहिली पोस्ट, आनंद गगनात मावेना, कलाकारांकडूनही अभिनंदनाचा वर्षाव
यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “एक फायब्रॉइड जो खूप मोठा होतो तो गर्भाशयाच्या आतील आणि बाहेरील भाग खराब करू शकतो. या गाठींमुळे तुम्ही आई होण्याच्या आनंदाला मुकू शकता. अनेक प्रकरणांमध्ये, काही फायब्रॉइड्स श्रोणि किंवा पोटाचे क्षेत्र भरण्याइतके मोठे होतात. कृतिकाला हा आजार झाल्यामुळे ती प्रेग्नंट असल्याचा भास होतो”.
कृतिकाने शेअर केलेल्या या व्हिडीओखाली तिच्या अनेक चाहत्यांसह मित्रपरिवाराने तिला या आजारातून बरे होण्यासाठी सदिच्छा दिल्या आहेत. तसेच अनेक चाहते तिच्यासाठी प्रार्थना करत आहेत. कृतिका एक अभिनेत्री असण्याबरोबर रक नृत्यांगनादेखील आहे. कृतिकाने आजपर्यंत काही डान्स रिऍलिटी शोमधून प्रसिद्धी मिळवली. तसेच ‘गैरी’, ‘टाईमपास ३’ चित्रपटात तिने आयटम सॉन्ग केलं आहे.