शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : “मी योग्यवेळी येऊन…”, क्रांती रेडकरच्या मुलीने कापले स्वतःचेच केस; म्हणाली, “काय तर म्हणे…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 16, 2023 | 10:35 am
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Kranti redkar shared a video of daughters

Kranti redkar shared a video of daughters

मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे क्रांती रेडकर. तिने आजवर बऱ्याच चित्रपटांत काम करत आपल्या अभिनयातून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सध्या ती अभिनय क्षेत्रापासून लांब असली तरीही नुकतंच तिने छोट्या पडद्यावरील ‘ढोलकीच्या तालावर’ कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका उत्तमरित्या पार पाडताना दिसली होती. क्रांती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. विशेष म्हणजे तिच्या दोन जुळ्या मुलींचे व्हिडिओ व फोटो ती सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. असाच तिने तिच्या मुलींचा एक अतरंगी करामतीचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. (Kranti redkar shared a video of daughters)

क्रांतीला दोन जुळ्या मुली आहेत. ती नेहमी त्यांचे गोड क्षण तिच्या चाहत्यांना शेअर करत असते. चाहत्यांनाही तिच्या मुलींचे व्हिडिओ बरेच आवडताना दिसतात. आताही तिने तिच्या मुलींचा नवीन व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत क्रांती तिच्या मुलींची करामत सांगताना दिसते. ती सांगते, “आमच्याकडे पक्षांच घरटं बनवण्याची योजना आखली जात होती. तो हा प्रोग्राम आहे”.  क्रांतीने कॅमेरा खाली फिरवला. तिथे कात्री, कापडं आणि बॉक्स पडलेला दिसत आहे. क्रांती पुढे सांगते, “या बॉक्समध्ये पक्षांना ठेवण्यासाठी गवत सापडत नव्हती म्हणून छबीलने स्वतःचेच केस कापून गवत बनवलं. मी योग्यवेळी येऊन हा प्रयोग थांबवल्यामुळे छबीलचे केस वाचले. नाहीतर पक्षी छबीलच्या केसांमध्येच राहिला असता”.

View this post on Instagram

A post shared by Kranti Redkar Wankhede (@kranti_redkar)

आणखी वाचा – Ind Vs Pak Match : भारत-पाकिस्तान मॅचवरून नेटकऱ्यांना आठवला जेठालाल, सोशल मीडियावर तुफान मीम्स व्हायरल

बॉक्समध्ये ठेवण्यासाठी काही सापडत नव्हतं म्हणून क्रांतीच्या मुलींने स्वतःचे केस कापले. नशीबाने क्रांती वेळेवर पोहोचल्यामुळे तिच्या मुलीचे केस वाचले. हे करताना त्यांनी कात्री, बॉक्स, स्वतःचे जुने कपडे घेऊन ही योजना पुर्णत्वास आणण्याची तयारी केली होती. पण त्यांच्या आईने म्हणजेच क्रांतीने ही योजना मोडीस काढली. हा व्हिडिओ शेअर करत क्रांतीने याला कॅप्शन दिलं, ‘काय तर म्हणे बर्ड बॉक्स’.

View this post on Instagram

A post shared by Kranti Redkar Wankhede (@kranti_redkar)

आणखी वाचा – “त्यांना सांगणं चुकीचं होतं का असं…”, अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करताना हेमांगी कवीबरोबर नेमकं काय घडलं?, म्हणाली, “अर्ध्या तासामध्येच मी…”

सध्या हा व्हिडिओ बराच व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांसह कलाकारांनाही हा व्हिडिओ आवडताना दिसत आहे. या व्हिडिओवर बऱ्याच कलाकारांनीही कमेंट केल्या आहेत. तेजस्विनी पंडितने यावर कमेंट करत लिहिते, ‘मला असं वाटतं आपण सर्वांनी लहानपणी हे सगळं केलं असेल. मी तर केलं आहे. स्वतःचेच केस कापून टकल्या बाहुलीला ते चिकटवले आहेत. त्याची मिशी बनवून त्यांच्याशी खेळणं…go Chhabil! माफ कर क्रांती ताई’, असं लिहीत तेजस्विनीने आपल्या लहानपणीचा किस्सा शेअर केला. तर नेटकऱ्यांनीही भरभरून लाईक व कमेंटचा वर्षाव केला आहे. एक नेटकरी लिहीतो, ‘क्रांती मॅम तुम्ही एवढ्या व्यस्त असूनही किती वेळ देता मुलांसाठी! मॅम तुमचा खूप अभिमान वाटतो. खूप प्रेम!’, अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या नेटकऱ्याने, ‘तुम्ही उशीरा आला असता तर छबील कशी दिसले असती याची मी कल्पना करु शकते’, अशी कमेंट केली आहे.  

Tags: kranti redkarmarathi actress
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

“आता वेदना होणार नाहीत”, कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या विभू राघवसाठी अभिनेत्री भावुक, अंत्यसंस्कारावेळीही ढसाढसा रडताना दिसली आणि…

जून 5, 2025 | 5:18 pm
Next Post
Myra Vaikul And CM Eknath Shinde

Video : मायरा वायकुळने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेतली भेट, भर गर्दीत तिच्या एका कृतीने सगळ्यांचीच जिंकली मनं, नेटकरी म्हणाले, "संस्कार खूप…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.