मंगळवार, सप्टेंबर 1, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

ठाणे-घोडबंदर रोडवर सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा अपघात, व्हिडीओ शेअर करत संताप व्यक्त, म्हणाल्या, “पुढं जाण्याची घाई…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 13, 2026 | 3:40 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
kishori shahane accident

ठाणे-घोडबंदर रोडवर सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा अपघात, व्हिडीओ शेअर करत संताप व्यक्त, म्हणाल्या, "पुढं जाण्याची घाई…"

kishori shahane accident : अनेक कलाकार मंडळी रस्त्यांच्या दुरावस्थेवर भाष्य करताना दिसतात. ठाणे-घोडबंदर रोडवरील ट्राफिकवर तर अनेकदा चर्चा होताना दिसते. रस्ते अपघात तर हल्ली सर्रासपणे झालेले पाहायला मिळतात. अशातच आता एका मराठमोळ्या अभिनेत्रीचा कार अपघात झाला असल्याचं समोर आलं आहे. अभिनेत्रीने स्वतःच या कार अपघाताबाबत माहिती दिली आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि ज्येष्ठ अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या गाडीला ठाणे-मुंबई रस्त्यावर अपघात झाला आहे. शूटिंगनिमित्त प्रवास करत असताना त्यांच्या कारला दुसऱ्या एका वाहनानं धडक दिली.

सुदैवानं या घटनेत किशोरी शहाणे यांना कोणतीही गंभीर इजा झालेली नाही, मात्र त्यांच्या गाडीचे नुकसान झालं असल्याचं त्यांनी सांगितलं. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत किशोरी यांनी नेमकं काय घडलं ते सांगितलं. या धडकेमुळं किशोरी शहाणे यांच्या गाडीचा साईड मिरर पूर्णपणे तुटला आणि गाडीच्या दरवाजाचेही नुकसान झालं.

आणखी वाचा – “बार डान्सर…”, दीपाली सय्यदच्या बोलण्याने राधा पाटीलच्या डोळ्यांत पाणी, रडतच म्हणाली, “मी पण लायकी काढू शकते…”

View this post on Instagram

A post shared by Kishori Shahane Vij (@kishorishahane)

अपघाताबाबतची पोस्ट शेअर करत किशोरी यांनी म्हटलं की, “खरं तर सगळ्यांनाच पुढं जाण्याची घाई असते, मलाही आहे. पण तुम्ही इतके असंवेदनशील कसं असू शकता? कोणाच्या तरी गाडीला धडक बसतेय, त्यांचं नुकसान होतंय याकडं तुमचं लक्षही नसतं. मला त्या व्यक्तीचा खूप राग येतोय… अशा घटनांमुळं केवळ पैसा आणि वेळच वाया जात नाही, तर मनस्तापही प्रचंड होतो”, असं म्हणत किशोरी यांनी संताप व्यक्त केला. संबंधित व्यक्ती या अपघातानंतर तिथे थांबलीही नाही, याचा किशोरी शहाणे यांना अधिक मनस्ताप झाला.

Tags: kishori shahanekishori shahane accidentmarathi actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
 Badshah and Isha Rikhi announced Divorce
Entertainment

पाच महिन्यानंतच संसार मोडला, सुप्रसिद्ध गायकाचा घटस्फोट, लग्नापूर्वी चार वर्ष केलं एकमेकांना डेट अन्…

सप्टेंबर 1, 2026 | 7:58 am
Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Next Post
'Bigg Boss Marathi 6' Promo

"माझ्या स्वप्नांशी खेळू नकोस…"; 'पॉवर की'ला हलक्यात घेणं रुचिताला भारी पडणार, 'बिग बॉस'च्या घरात तिसऱ्या दिवशी धोक्याची घंटा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.