मालिका असो या चित्रपट त्यातील गाणी किंवा टायटल ट्रक हे नेहमी चाहत्यांच्या पसंतीस उतरतात. चाहतेदेखील या गाण्यांवर व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर शेअर करतात. तर अश्याच एका मालिकेच्या टायटल ट्रकची भुरळ मराठमोळ्या अभिनेत्रीला पडलेली पाहायला मिळते, विशेष म्हणजे या मालिकेत ती स्वतः मुख्य भूमिकेत पाहायला मिळते. ही अभिनेत्री आहे, जुई गडकरी(Jui Gadkari)
छोट्या पडद्यावरील ठरलं तर मग ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. यातील अर्जुन आणि सायली यांची जोडी देखील चाहत्यांच्या पसंतीस उतरते. तर या मालिकेत नुकतंच सायली आणि जुई यांचं लग्न पार पडलंय. जुई गडकरी या मालिकेत मुख्य भूमिका साकारताना दिसतेय. मालिकेतील मिस गडबडगोंधळ असणारी जुई प्रेक्षकांची मनं जिंकतेय. यासोबत ती सोशल मीडियावर देखील कमलाईची सक्रिय असलेली पाहायला मिळते.ती सोशल मीडियावर सेटवरील अनेक Bts व्हिडीओ शेअर करते, तसेच तिला गाण्याची आणि स्वयंपाक बनविण्याची आवड आहे हे तिच्या सोशल मीडियावरून समजतं, तर अश्यातच तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ती ठरलं तर मग या तिच्या मालिकेचे टायटल ट्रक सॉंग गाताना दिसते.

जुईच्या सुरेल आवाजातील गाणं नक्की ऐका
सुरात असो वा नसो!!!! मला गायन आवडते!!!! माझ्या शो #tharlatarmag चा टायटल ट्रॅक गाण्याचा प्रयत्न केला.मी आधीच या गाण्याच्या प्रेमात पडले!! आणि हे गाण मला आनंदित करते !! असं म्हणत तिने ज्यांनी हे टायटल सॉंग गायलं. त्यांना कृपया प्लीज चुका माफ करा असं म्हटलंय. तर पुढे देखील ती म्हणाली, मला खूप आनंद होतो की, माझ्या शो चं गाणं इतकं सुंदर आहे!!! रोहिणी ताई तुम्ही खूप सुरेख लिरिक्स लिहिले आहे! आणि संगीताचं त्रिकूट प्रियंका, हृषिकेश दादा आणि निलेश दादा असं कॅप्शन देत तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे. तर तिच्या आवाजातील हे गाणं चाहत्यांपासून ते कलाकारांपर्यंत सगळ्यांच्या पसंतीस उतरलं असून अनेकांनी कॉमेंट करत तिचं कौतुक केलं.
====
हे देखील वाचा- कावेरी रत्नमाला यांचा जीव वाचविण्यासाठी स्वतःची किडनी देणार?
====
मराठमोळी अभिनेत्री जुई गडकरी मागील दोन ते तीन वर्षांपासून अभिनयक्षेत्रापासून दूर राहिली होती. तिने ‘पुढचं पाऊल’, ‘सरस्वती’ यांसारख्या मराठी मालिकांमध्ये काम करत तिने प्रेक्षकांची मनं जिंकली. या शिवाय ‘बिग बॉस मराठी’ या बहुचर्चित कार्यक्रमामध्ये सहभागी झाली होती.