मराठी सिनेविश्वात सध्या लगीनघाई सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. येत्या काही दिवसांत मराठी सिनेसृष्टीतील अनेक लोकप्रिय जोड्या विवाहबंधनात अडकणार आहेत. शाल्व किंजवडेकर-श्रेया डफलापुरकर, अंकिता वालावलकर-कुणाल भगत, किरण गायकवाड-वैष्णवी कल्याणकर या जोड्या लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. अशातच आता आणखी एका अभिनेत्रीच्या घरी लगीनघाईला सुरुवात झाली आहे आणि ही अभिनेत्री म्हणजे हेमल इंगळे. मराठीसह हिंदी सिनेविश्वात लोकप्रिय असलेली हेमल लवकरच तिच्या एका नवीन प्रवासाला सुरुवात करत आहे. (Hemal Ingle Kelvan)
हेमलच्या घरी आता लगीनघाईला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीचं केळवण नुकतंच पार पडलं. याची खास झलक तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे. हेमलने ऑगस्ट महिन्यात इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत आपल्या साखरपुड्याची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली. त्यानंतर अभिनेत्री लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. नुकतंच तिचं केळवण पार पडलं. कोल्हापुरात अभिनेत्रीचं केळवण पार पडलं आहे. याचे खास फोटो हेमलने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. “केळवणाला दणक्यात सुरुवात…” असं कॅप्शन देत अभिनेत्रीने हा खास क्षण चाहत्यांबरोबर शेअर केला आहे.
आणखी वाचा – अमेरिकेमध्ये शिकत आहे ऐश्वर्या व अविनाश नारकर यांचा लेक, लेकाबद्दल म्हणाले, “त्याच्याबरोबर काम करायचंय आणि…”
यावेळी तिचा होणारा पतीदेखील उपस्थित होता. फुलांची सजावट करून या दोघांचा केळवण समारंभ एकत्रितरित्या पार पडला. त्याचबरोबर हेमलने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर होणाऱ्या नवऱ्याबरोबरचा रोमँटिक फोटोही शेअर केला आहे. केळवणाच्या या खास सोहळ्यासाठी तिने गडद जांभळ्या रंगाचा गाऊन ड्रेस परिधान केला होता. तट तिच्या होणाऱ्या नवऱ्याने पांढरा कुर्ता व त्यावर डिझानर ब्लेझर जॅकेट घातला होता. त्यांचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसंच अनेकांनी दोघांना कमेंट्स मध्ये शुभेच्छाही दिल्या आहेत.
दरम्यान, हेमलने आता केळवणाचे फोटो शेअर केल्यानंतर तिच्या चाहत्यांना अभिनेत्री लग्नबंधनात कधी अडकणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. मात्र अभिनेत्रीने अद्याप लग्नाची तारीख जाहीर केलेली नाही.त्यामुळे अनेक जण तिच्या लग्नाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. हेमलच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती नुकतीच ‘नवरा माझा नवसाचा २’या चित्रपटात पाहायला मिळाली होती