मराठी मनोरंजन सृष्टीतील सदाबहार जोडपं म्हणजे नारकर कपल. आजवर अभिनेत्री ऐश्वर्या नारकर व अभिनेते अविनाश नारकर यांनी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान मिळवलं आहे. गेली कित्येक वर्षे हे कपल मराठी मालिका, नाटक व चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. हे कपल सोशल मीडियावरही बरेच सक्रिय असतात. विविध फोटोज् व्हिडीओसह ते ट्रेण्डिंग गाण्यावर बऱ्याचदा रिल्स बनवताना दिसतात. त्यांच्या या रिल्सचं कौतुकही होतं पण बऱ्याचदा त्यांना ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागतं. बऱ्याचदा या ट्रोलर्सना ऐश्वर्या नारकर कमेंटद्वारे उत्तर देताना दिसतात. आताही त्यांनी ‘रंगाई एंटरटेंन्मेंट’ यांच्या ‘रंगात रंगली दिवाळी’ या कार्यक्रमात ट्रोलिंग करणाऱ्यांबाबत वक्तव्य केलं आहे. (Aishwarya narkar give advice to the trollers)
बऱ्याचदा ऐश्वर्या त्यांच्या अंदाजात ट्रोलर्सना उत्तरं देताना दिसतात. आताही त्यांना एका कार्यक्रमात विचारण्यात आलं की, “अशा काही गोष्टी होतात ज्यामुळे तुम्ही ट्रोलिंग होता. याविषयावर नक्की तुझं काय मत आहे?”, या प्रश्नावर उत्तर देताना ऐश्वर्या म्हणाल्या, “मला वाटतं आमचं काही चुकलं तर आम्हाला सांगितल्यावर असा स्फोट होऊ नये किंवा होत नसावा. सांगण्याची पद्धत काय आहे याच्यावर सगळं अवलंबून असतं. एकतर आपल्याला व्यक्तिस्वातंत्र्य आहे. म्हणून ते व्यक्तिस्वातंत्र्य जर दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारं असेल, तर ते व्यक्तिस्वातंत्र्य आपण थोडं आटोक्यात ठेवलं पाहिजे”.
ऐश्वर्या पुढे सांगतात, “ जर तुम्हाला काही आवडलं नाही तर ते तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे जसं टेलव्हिजनवर तुम्हाला एखादा एपिसोड आवडला नाही तर तुम्ही स्वतःचा टिव्ही बंद करता. तसं जर सोशल मीडियाला तुम्ही एखाद्याला फॉलो करत आहात आणि त्याच्या पोस्ट तुम्हाला आवडत नाहीत तर त्याच्यावर वाईट पद्धतीने प्रतिक्रिया देण्याचा तुम्हाला काहीही अधिकार नाही. जर तुम्हाला ते आवडत नाही तर तुम्ही त्यांना अनफॉलो करणं हा सोपा उपाय तुमच्याकडे असतो. ज्यांनी तुम्ही स्वतःचा त्रासही वाचवू शकता आणि समोरच्याचा अपमानही वाचवू शकता”, हा व्हिडीओ ऐश्वर्या यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.
त्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनीही बरेच लाईक व कमेंट केले आहेत. कलाकारांनीही या व्हिडिओवर कमेंट केले आहेत. अभिनेत्री तितिक्षा हिने देखील हार्टचे सिंम्बॉल कमेंट करत बरोबर असं लिहीत कमेंट केली आहे. एका नेटकऱ्याने कमेटं करत लिहिलं, ‘जाऊद्या ऐश्वर्या मॅम. तुम्ही भुंकणाऱ्या कुत्र्यांकडे लक्ष देऊ नका. तुमच्यावर प्रेम करणारी माणसं खूप आहेत’, अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या नेटकऱ्याने, ‘आपण कितीही प्रबोधन केले तरी म्हशीसमोर पिपाणी वाजवण्यासारखं आहे, सुधारणा तर होणारच नाही’, अशी कमेंट केली आहे.