मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर. ९०च्या दशकापासून त्यांचा क्रेझ आजही तितकाच पाहायला मिळतो आहे. त्यांच्या अभिनयाचा व सौंदर्याचा वेगळा असा चाहतावर्ग आहे. त्यांच्यातील तारुण्य व ऊर्जा ही आजच्या पिढीला लाजवेल अशी आहे. त्यांनी स्वतःला काळाप्रमाणे बदलंत ठेवलं आहे. पण असं असलं तरीही त्या परंपरा नेहमी जपताना दिसतात. सध्या सगळीकडे दीपावली मोठ्या उत्साहात साजरी होताना दिसते आहे. ऐश्वर्या यांच्या घरी ही दिवाळी सण जल्लोष पाहायला मिळाला. ऐश्वर्या यांनी दिवाळी सण अगदी पारंपारीक रित्या साजरा केलेला पाहायला मिळाला. लक्ष्मीपूजन करतानाचा त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (aishwarya narkar Diwali laxmi poojan)
दीपावली सणातील महत्त्वाचा एक भाग म्हणजे लक्ष्मीपूजन. भारतात सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारे लक्ष्मीचं पूजन केलं जातं. ऐश्वर्यादेखील लक्ष्मीचं पूजन अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीनं करताना दिसल्या. त्यांनी पूजा करतानाचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओत ऐश्वर्या यांनी पूजेची केलेली छान मांडणी दिसत आहे. चौरंगावर देवीची प्रतिकृती मांडण्यात आलेली पाहायला मिळाली. त्यावर लाल कपडा मांडून त्यावर कलश, नारळ आणि त्याला दागिनेंनी सजवण्यात आलं आहे. मागे महालक्ष्मी देवीची प्रतिमा असलेला फोटो आहे. त्याचबरोबर गणेशाची व लक्ष्मीची मुर्तीही पुजेला लावलेली दिसली. व्हिडीओतील गुळ, फळांचा नैवेद्य याने पूजेला पूर्णत्व प्राप्त झालेलं दिसलं.
ऐश्वर्या यांनी दुधाने गणपतीच्या व लक्ष्मीच्या मुर्तींना दूधाने अभिषेक केला. त्यानंतर त्यांनी लक्ष्मीची मुर्ती तांदळात ठेवून त्यात इतर प्रतिकांचीही पूजा करण्यात आली. एका वहीवर सरस्वतीची प्रतिक चिन्ह काढून त्याची पूजा करण्यात आली. अशाप्रकारे पारंपारीक अंदाजात ऐश्वर्या यांनी लक्ष्मीचं पूजन केलं. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये ‘लक्ष्मीपूजन’ असं लिहीलं आहे.
आणखी वाचा – अमृता खानविलकरसाठी राज ठाकरेंकडून दिवाळीची खास भेट, गिफ्टमध्ये नक्की काय?
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनीही लाईक, कमेंट केले आहेत. एका नेटकऱ्याने लिहीलं की, ‘दिवाळीच्या खूप शुभेच्छा! लक्ष्मीपूजन अतिशय सुंदर केलं आहे’, अशी कमेंट करत कौतुक केलं आहे. तर दुसऱ्या नेटकऱ्याने, ‘उजे लोग उची पसंद ऐश्वर्या मॅडम खूप छान’, अशी कमेंट केली आहे.