वयाची पन्नाशी ओलांडली असली तरीही आपल्या फिटनेस व उत्साहातून प्रत्येक तरुणाला लाजवतील अशा कलाकारांच्या यादीत अव्वल स्थानावर आहेत ते म्हणजे एव्हरग्रीन नारकर कपल. अभिनेते अविनाश नारकर व अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांच्या जोडीनं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. विविध ट्रेंडिंग रील्स, योगा, व्यायाम, यांसारख्या विविध विषयांवर व्हिडिओ बनवण्यात या कपलचा हातखंडा आहे. या व्हिडिओमधील त्यांची एनर्जी पाहता आताच्या तरुण पिढीला स्वतःच्या फिटनेसबाबत प्रश्न पडला असेल. त्यांनी शेअर केलेल्या रिल्सवर कधी कौतुकांच्या वर्षा होतो तर कधी त्यांना ट्रोलचाही सामना करावा लागतो. सध्या हे कपल पुन्हा ट्रोल होताना दिसत आहे. (aishwarya narkar answered to the troller)
बऱ्याचदा ही जोडी ट्रोलर्सना सडेतोड उत्तरही देत असते. आजही कारण काही तसंच आहे. नुकतंच या कपलने एका ट्रेंडिंग गाण्यावर व्हिडिओ बनवत शेअर केला होता. नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडिओवर एक टोलर्सने कमेंट करत पुन्हा या कपलला ट्रोल केलं आहे. यावर अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या ट्रोलरला चांगलंच उत्तर दिलं आहे.
नुकताच त्यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ते क्लॉथ ट्रांजिशन व्हिडिओत दिसले. घरातील कपड्यांमधून पारंपारिक अंदाजात हा व्हिडिओ ट्रांजिशन होताना दिसतो. मराठमोळ्या पारंपारीक लूकमध्ये दोघंही खूप छान दिसत होते. यात अविनाश नारकर यांनी पांढऱ्या रंगाचं धोतर नेसलं होतं तर ऐश्वर्या यांनी पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. या व्हिडिओत नेहमी प्रमाणे दोघंही छान पोज देताना दिसले. इतर व्हिडिओंप्रमाणे हा व्हिडिओ देखील बराच व्हायरल झाला.

नेटकऱ्यांनी लाईक व कमेंट करत कौतुकाचा वर्षाव केला आहे. मात्र ट्रोलर्सही ट्रोल करताना दिसले. या ट्रोलर्सना पुन्हा एकदा ऐश्वर्या नारकर यांनी सडेतोड प्रत्योत्तर दिलं आहे. ट्रोलर्सने कमेंट केली, ‘नमस्कार आजोबा’ त्यावर ऐश्वर्या नारकर यांनी उत्तर देत कमेंट केला, ‘काय म्हणता पणजोबा?’. ऐश्वर्या यांच्या या कमेंटवर बरेच लाईक आले आहेत. त्याचबरोबर नेटकऱ्यांनीही हसण्याचे इमोजी शेअर करत कमेंट केले आहे.