मराठी सिनेसृष्टीत अशी बरीच कलाकार मंडळी आहेत ज्यांनी स्वतःचं घर घेतलं असल्याचं पाहायला मिळालं. घर घेतल्यानंतर ही कलाकार मंडळी सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसह आनंदाची बातमी शेअर करताना पाहायला मिळतात. अशातच काही दिवसांपूर्वी एका मराठमोळ्या अभिनेत्रीने स्वतःचं घर घेतलं असल्याची आनंदाची बातमी सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसह शेअर केली आहे. ही अभिनेत्री म्हणजेच अदिती द्रविड. ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतून अदितीने लोकप्रियता मिळवली. (Aditi Dravid New Home)
सोशल मीडियावर ही अदिती बऱ्यापैकी सक्रिय असते. अभिनेत्री असण्याशिवाय अदिती उत्तम कवियित्रीसुद्धा आहे. ‘बाईपण भारी देवा’ या गाजलेल्या चित्रपटात अदितीने लिहिलेलं गाणं हे विशेष गाजलं. काही दिवसांपूर्वीच अदितीने चाहत्यांसह एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. अभिनेत्रीने मुंबईत स्वतःचं नवंकोरं घर घेतलं असल्याची बातमी तिने शेअर केली. अदिती द्रविडने मुंबईत अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर स्वत:चं हक्काचं घर खरेदी केलं.
यानंतर आता अदितीने तिच्या नव्या घरासाठी बनवलेल्या सुंदर अशा नेमप्लेटचा फोटो शेअर करत त्याखाली दिलेल्या कॅप्शनने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. “२०१५ला पहिल्यांदा मुंबईत आले होते. त्यानंतर अनेक घरं बदलली. रेंटने घर, शेयरिंगमध्ये घर सर्व काही. चांगले वाईट अनुभव घेत अभिनयचा प्रवास चालू होता. २०१९ मध्ये एक शॉर्टफिल्म शूट करत होते. Covid चा काळ असल्याने तेव्हा रेंटच घर सोडलं होतं. एका दिवसात शूट संपणं अपेक्षित होतं म्हणून कुठेही सोय बघून ठेवली नव्हती. पॅकअप होताना समजलं की अजून एक दिवस शूट वाढलं आहे आणि कोणतीही alternative सोय करायचा आत दिग्दर्शक पॅकअप म्हणाले अणि एका क्षणात १०० लोकांनी गजबजलेला सेट, पूर्ण रिकामा झाला. बरीच रात्र झाली होती,काय करावं काही सुचेना. मला ऐनवेळी तिथे रेवती लिमये भेटली आणि अडचण कळताच क्षणी ती मला तिच्या घरी घेऊन गेली. यासाठी मी कायम तिची ऋणी आहे. पण ती पूर्ण रात्र झोप लागली नाही. विचार करत राहिले आणि स्वतःच घर घ्यायचं हे त्याच रात्री ठरवलं. त्यानंतर ४ वर्ष गेली, कष्ट आणि आई वडिलांच्या आशीर्वादाने आज अखेर हे घडतयं. अजूनही विश्वास बसत नाही आहे हे सत्य आहे”.
घर घेतल्याची खास पोस्ट आणि आपल्या घराची पहिली झलक तिने इन्स्टाग्रामवर शेअर केली. पहिल्या फोटोमध्ये गृहप्रवेश पूजन तर, तिने शेअर केलेल्या दुसऱ्या फोटोमध्ये तिच्या नव्या घराचा खोली क्रमांक ८०१ असल्याचं पाहायला मिळाला. यावेळी तिने घरात गोवऱ्यांची छोटीशी चूल मांडलेलीही पाहायला मिळाली. तसेच दुसऱ्या फोटोमध्ये अदिती गृहप्रवेश करतानाचे पाहायला मिळत आहे. तर तिसऱ्या फोटोमध्ये तिने तिच्या घराच्या पूजेचे काही खास क्षण चाहत्यांबरोबर शेअर केले.