बुधवार, सप्टेंबर 27, 2023
Its Majja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Photo Gallery
No Result
View All Result
Its Majja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Photo Gallery
No Result
View All Result
Its Majja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Photo Gallery

Home - ज्येष्ठ शास्त्रीय गायिका मालिनी राजूरकर काळाच्या पडद्याआड, सुबोध भावेची भावुक पोस्ट, म्हणाला, “तुम्हाला प्रत्यक्ष…”

ज्येष्ठ शास्त्रीय गायिका मालिनी राजूरकर काळाच्या पडद्याआड, सुबोध भावेची भावुक पोस्ट, म्हणाला, “तुम्हाला प्रत्यक्ष…”

Sneha GaonkarbySneha Gaonkar
सप्टेंबर 7, 2023 | 10:28 am
in Marathi Masala
Reading Time: 3 mins read
Singer Malini Rajurkar Death

ज्येष्ठ शास्त्रीय गायिका मालिनी राजूरकर काळाच्या पडद्याआड, सुबोध भावेची भावुक पोस्ट, म्हणाला, "तुम्हाला प्रत्यक्ष…"

ग्वाल्हेर घराण्याच्या ज्येष्ठ शास्त्रीय गायिका मालिनी राजूरकर यांचं वयाच्या ८२व्या वर्षी निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. बुधवारी दुपारी सव्वाचारच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. अचानक प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना मंगळवारी हैदराबाद येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मालिनी राजूरकर यांच्या निधनाची बातमीची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात दोन मुली आहेत. (Singer Malini Rajurkar Death)

मालिनी राजूरकर यांचे ‘ख्याल’ व ‘टप्पा’ या गायन प्रकारांवर विशेष प्रभुत्व असलेले पाहायला मिळाले. अभिजात संगीताच्या प्रचारासाठी त्या कायम प्रयत्नशील राहिल्या. ग्वाल्हेर घराण्याची परंपरा समृद्ध करणाऱ्या वझेबुवा आणि त्यांचे गुरुजी निसार हुसेनखाँ, भूगंधर्व रहिमतखाँ, वासुदेवबुवा जोशी, पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर, ओंकारनाथ ठाकूर यांची परंपरा कायम ठेवणारा आवाज म्हणून त्यांची ख्याती सर्वदूर पसरली होती.

आणखी वाचा – मराठी नाटककार आणि दिग्गज अभिनेते प्रशांत दामले यांना मातृशोक, विजया दामले यांनी राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

मालिनी राजूरकर यांचा जन्म १९४१ मध्ये अजमेर येथे झाला. अजमेर येथेच त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. शिक्षण घेत असताना त्यांनी गणित या विषयात पदवी संपादन केली. त्यांनतर त्यांनी अजमेरमधील सावित्री माध्यमिक शाळा व महाविद्यालयात तीन वर्ष गणिताचे अध्यापन केले. शिवाय कला विषयात तीन वर्षांची शिष्यवृत्ती त्यांना मिळाली आणि त्यांनी आपली संगीताची आवड पुढे जोपासली. अजमेर संगीत महाविद्यालयात गोविंदराव राजूरकर आणि त्यांचा पुतण्या वसंतराव राजूरकर यांच्याकडे संगीताचे पुढील धडे घेतले. पुढे वसंतराव राजूरकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला.

View this post on Instagram

A post shared by सुबोध भावे(Subodh Bhave) (@subodhbhave)

आणखी वाचा – “ती तुमची चॉईस आहे…” ऑनलाईन खेळाच्या जाहिराती करण्यावर गिरीजा ओक स्पष्टच बोलली, म्हणाली, “मी जाहिरात…”

अतिशय तत्वनिष्ठ, सांगीतिक मूल्यांशी तडजोड न करणाऱ्या अशा कलावंत आज काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. अनेक कलाकार मंडळींनी मालिनी ताईंना श्रद्धांजली वाहिली आहे. अशातच प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे याने देखील मालिनी ताईंना श्रद्धांजली वाहणारी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सुबोध भावे हा मालिनी ताईंसोबत पाहायला मिळतोय. पोस्ट शेअर करत त्याने म्हटलं आहे की, “तुमच्या गाण्यावर अफाट प्रेम होतं मालिनी ताई. तुम्हाला प्रत्यक्ष भेटता आलं, तुमचा आशिर्वाद मिळाला हे माझं भाग्य. तुमच्या जाण्याने अत्यंत साधेपणाने आपलं आयुष्य जगणारा पण गाण्याने कित्येकांना श्रीमंत करणार्‍या एका असामान्य कलाकाराची आणि माणसाची उणीव आम्हाला कायम जाणवत राहील. तुम्हाला भावपूर्ण श्रध्दांजली मालिनी ताई.”

Tags: entertainmentmalini rajurkarmalini rajurkar deathsubhodh bhavesubhodhbhave

Latest Post

Prabhakar More On Shalu Dance
Television Tadka

Video : चाहतीच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचले प्रभाकर मोरे, चाळीमध्येच शालू गाण्यावर धरला ठेका, साधेपणा पाहून होतंय कौतुक

सप्टेंबर 27, 2023 | 2:18 pm
Ankita Lokhande and husband Vicky Jain in Bigg Boss 17
Television Tadka

‘बिग बॉस १७’मध्ये ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री तिच्या पतीसह सहभागी होणार, एका शोसाठी केली इतकी शॉपिंग

सप्टेंबर 27, 2023 | 1:35 pm
Myra Vaikul On Ganeshotsav
Television Tadka

मायरा वायकुळने बाप्पासमोर घातलं गाऱ्हाणं, व्हिडीओ पाहून चाहते करताहेत कौतुक, म्हणाली, “आम्हाला माफ…”

सप्टेंबर 27, 2023 | 1:33 pm
Tiger 3 Teaser Out
Bollywood Gossip

Tiger 3 Teaser : “जब तक टायगर मरा नहीं, तब तक टायगर हारा नहीं”, ‘टायगर ३’चा धमाकेदार टीझर प्रदर्शित, काही मिनिटांमध्येच लाखो व्ह्युज

सप्टेंबर 27, 2023 | 12:32 pm
Next Post
Bhushan Pradhan reason to writes his mother name

…म्हणून भूषण प्रधान त्याच्या नावापुढे आईचं नाव लावतो, खुलासा करताना म्हणाला, "ज्या आईने माझ्यासाठी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Photo Gallery

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist