अभिनेता असो किंवा अभिनेत्री नेहमी त्याच्या कामासाठी प्रेक्षक त्याला ओळखतात. तुमच्या आमच्या सारख्या रसिकांना नेहमीच वाटत असत कि आपली मराठी चित्रपटसृष्टी, नाट्यसृष्टी नेहमीच समृद्ध व्हावी. बऱ्याचदा आपल्याकडे एखाद्या अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला हिंदीत काम करतात म्हणून ट्रोल केलं जात. या बद्दल कलाकार सहसा बोलणं टाळतात. पण अभिनेता संतोष जुवेकरने याबाबत आपलं मत मांडलं आहे.(Santosh Juvekar Raorambha)
संतोष लवकरच रावरंभा या ऐतिहासिक चित्रपटात एका नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. त्या भूमिकेतील लुक सुद्दा प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरत आहे. चित्रपटाच्या संगीत अनावरण सोहळ्यानिमित्त संतोष ने इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीत कलाकारांबद्दल प्रेक्षकांचं असलेलं मत या विषयी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहे.

संतोष ने दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला आहे कि बऱ्याचदा आम्ही कलाकार मंडळी हिंदी मध्ये काम करतो त्यामुळे ट्रोल केले जातो पण माझी प्रेक्षकांना विनंती आहे कि त्यांनी आपला मराठी चित्रपट सिनेमागृहात जाऊन बघावा आणि आपल्या चित्रपटानंवर तुमचं असलेलं हे प्रेम जस समृद्ध होत जाईल तेव्हा आम्हला इतर कुठेही काम करण्याची गरज भासणार नाही.
हे देखील वाचा- म्हणून अशोक सराफ नानांना म्हणाले..’काय नान्या श्रीमंत झालास का?’
तसेच रसिक मायबापाचं कलाकार, चित्रपट याबद्दलच प्रेम फक्त इंस्टाग्राम, फेसबुक या सोशल मीडियावर मर्यादित न ठेवता चित्रपटगृहांमध्ये जाऊन सुद्दा ते दाखवा असं आवाहन ही संतोष ने या मुलाखतीच्या माध्यमातून प्रेक्षकांना केलं आहे. मराठी कलाकार असो वा चित्रपट आपल्या सारख्या प्रेक्षकांचा त्यांना मिळणारा पाठिंबा हा कायम असाच राहिला तर मराठी मनोरंजन विश्व आणखी समृद्ध होण्यास फार काळ लागणार नाही.(Santosh Juvekar Raorambha)
अभिनेता संतोष जुवेकर ने याआधी अनेक हिंदी मराठी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. मराठीतील झेंडा, रेगे, मोरया, एक तारा अशा अनेक चित्रपटांमधील त्याच्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत.
हे देखील वाचा – आणि लक्ष्मीकांत निवेदिता सराफ यांना म्हणाले’बाई, एक लक्षात ठेव, तू चुकीचा सराफ शोधलास’