मराठी नाट्यसृष्टीतील विक्रमवीर म्हणून ओळखले जाणारे नाट्य कलावंत प्रशांत दामले यांनी आजवर सुमारे ३२ नाटकांचे तब्बल १२ हजार पाचशेंहून अधिक प्रयोग केले, जो एक विक्रम मानला जातो. अभिनयाव्यतिरिक्त त्यांनी नाट्यनिर्मिती क्षेत्रातही आपली छाप पाडली असून त्यांची निर्मिती असलेली व सध्या ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’, ‘सारखं काहीतरी होतंय’, ‘नियम व अटी लागू’ यांसारखी नाटकं आजही नाट्यगृहाबाहेर हाऊसफुल्लची बोर्ड लागलेली असतात.(Prashant Damle Drama)
एक रेकॉर्ड असा ही(Prashant Damle Drama)
तब्बल तीन दशकांहून अधिक काळ रंगभूमीला वाहून घेणारे प्रशांत दामले यांना मराठी नाट्यसृष्टीत मोठा चाहतावर्ग तयार करणारे कलावंत म्हणून देखील पाहिले जाते. ह्या काळात त्यांनी विविध नाटकांचे सलग प्रयोग करून तब्बल ५ विक्रम लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस् वर आपले नाव कोरले आहे. त्यांनी नुकताच आपल्या नाटकांचा १२ हजार ५०० प्रयोगांचा टप्पा गाठला असून त्यांची ही घोडदौड यशस्वीरीत्या सुरु आहे.
पण एक वेळ अशीही आली होती, ज्यामुळे प्रशांत दामले यांना आपल्या नाटकाचा प्रयोग रद्द करावा लागला. ह्याचे कारण म्हणजे, सतत प्रयोग करताना झालेला त्रास. तसा किस्सा प्रशांत दामले यांनी एका मुलाखतीत सांगितला. नुकताच प्रशांत दामले यांचा मुलाखतीचा कार्यक्रम झाला. त्यावेळी आपल्या नाट्यसृष्टीतील प्रवास आणि आठवणींबद्दल बोलताना ते म्हणाले, छंदाचे व्यवसायात रूपांतर झाले की ते सुखं असतं. आजपर्यंत माझे १२ हजार ७२३ प्रयोग झाले, त्यामध्ये फक्त दोन वेळा प्रयोग रद्द करावे लागले आणि तेही माझा आवाज बसल्यामुळे.

पण माझ्या या प्रवासात माझे सहकारी भक्कमपणे माझ्या पाठीशी उभे होते. मला जे हवं होतं ते मिळत नाही असे वाटल्याने एकवेळ थांबावं वाटलं होतं. पण विचार केला, मी दुसरं करणार काय ? असा प्रश्न होता. त्याचवेळेस माझ्यावर निर्माता म्हणून एक वेगळी जबाबदारी आहे, याचीही जाणीव झाली यामुळे मी तो विचार मनातून काढून टाकला. आज मात्र मी निश्चयाने सांगतो, की जोपर्यंत माझे पाय चालतात तोपर्यंत रंगभूमीची सेवा करणार.
‘टूरटूर’ या नाटकापासून आपल्या करियरची सुरुवात करणाऱ्या प्रशांत दामले यांनी आजवर नाटक, सिनेमा व छोटा पडदा या तीनही माध्यमातून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. झी मराठीवरील ‘आम्ही सारे खवय्ये’ या शोसह ‘घरकुल’, ‘बे दुणे तीन’ या मालिका व दूरदर्शनवरील ‘महाराष्ट्राची लोकधारा’ कार्यक्रमांतून प्रशांत दामले घराघरात पोहोचले.(Prashant Damle Drama)