शनिवार, सप्टेंबर 12, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“परवापर्यंत आम्ही भेटत-बोलत होतो आणि…”, विजय कदम यांच्या निधनानंतर प्रशांत दामलेंना मोठा धक्का, म्हणाले, “आजारी होता पण…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 10, 2024 | 1:08 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Prashant Damle On Vijay kadam

विजय कदम यांच्याबद्दल बोलताना प्रशंत दामले झाले भावुक

Prashant Damle On Vijay kadam : मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेते विजय कदम यांच्या निधनाने सर्वत्र शोकाकुल वातावरण आहे. आज (१० ऑगस्ट) पहाटेच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजाराई होते. त्यांना कर्करोग झाल्याचेही काही काळापूर्वी समोर आले होते. उपचार घेत त्यांनी या रोगावर मातदेखील केली मात्र त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने सर्वांनाचा मोठा धक्का बसला आहे. आजवर त्यांनी मराठी चित्रपट, मालिका तसेच नाटकांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. तसेच मनोरंजन सृष्टीमध्येही त्यांचे अनेक चाहते आहेत.

विजय यांच्या निधनाच्या वृत्ताने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक कलाकार मंडळीनीदेखील त्यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. अशातच आता अभिनेते प्रशांत दामले यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘एबीपी माझा’शी संवाद साधताना ते म्हणाले की, “ही दुःखद आणि धक्कादायक बातमी आहे. तसा तो आजारी होता पण इतक्या लवकरच निधन होईल असं वाटत नव्हतं. परवापर्यंत आम्ही भेटत होतो बोलत होतो. पहिल्यांदाच मला अभिनय शिकण्याची संधी त्याच्याकडेच मिळाली”.

आणखी वाचा – Vijay Kadam Death : सुप्रसिद्ध मराठी अभिनेते विजय कदम यांचे निधन, कर्करोगाशी झुंज अपयशी, कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर

पुढे ते म्हणाले की, “१९८३ साली मी पहिल्यांदा ‘टूरटूर’ नाटकात काम केलं होतं. त्यावेळी लक्ष्मीकांत बेर्डे आणि विजय कदम यांची जोडी सुपरहिट होती. त्यांना बघत बघत आम्ही शिकत होतो. मी,विजय चव्हाण, प्रदीप पटवर्धन, जयवंत वाडकर आम्ही सगळे जण  लक्ष्मीकांत बेर्डे आणि विजय कदम यांना बघून शिकत होतो. विजय खूपच भारी होता. त्याची भाषाशैली उत्तम होती. त्याची रिअ‍ॅक्ट करण्याची पद्धत छान होती. तो सहाय्यक कलाकारांना खूप पाठिंबा द्यायचा. पण तो फारच लवकर गेला असं मला वाटतं. खरंच खूप दुःखदायक आहे”.

आणखी वाचा – पहिल्या नवऱ्याकडून शारीरिक, मानसिक छळ, दुसरं लग्नही आठ महिन्यांतच मोडलं अन्…; आता असं आयुष्य जगत आहे सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री

तसेच त्यांच्या आठवणीबद्दल सांगताना ते म्हणाले की, “आमच्या आठवणी तशा खूप आहेत. माझा पहिला चित्रपट मी त्याच्याबरोबर केला होता. पण नाटकात आपण जसे हावभाव किंवा रिॲक्शन देतो तशा रिॲक्शन चित्रपटांमध्ये द्यायच्या नसतात. याचं त्याने मला प्रात्यक्षिकही करुन दाखवलं होतं आणि तो सर्व माझ्यासमोर बसून सगळं समजावून सांगायचा”. दरम्यान आता मनोरंजन क्षेत्रातून त्यांना सर्व कलाकार श्रद्धांजली वाहत आहेत. त्यांनी आजवर केलेल्या कामाचेही सगळेजण कौतुक करताना दिसत आहेत.

Tags: prashant damleprassed awayVijay Kadam
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Next Post
megha dhade angry on Bigg Boss Marathi 5

Bigg Boss Marathi : "आगाऊ कार्टीला घराबाहेर काढा", जान्हवीचं वागणं पाहून मेघा धाडेला राग अनावर, म्हणाली, "हकलवून द्या आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.