रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : “आगाऊ कार्टीला घराबाहेर काढा”, जान्हवीचं वागणं पाहून मेघा धाडेला राग अनावर, म्हणाली, “हकलवून द्या आणि…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 10, 2024 | 1:28 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
megha dhade angry on Bigg Boss Marathi 5

'बिग बॉस मराठी' मध्ये जान्हवी किल्लेकर व वर्षा उसगांवकर यांच्यातील वादानंतर भडकली मेघा धाडे

Bigg Boss Marathi 5  : बिनधास्त, रोखठोक न पटलेल्या मुद्द्यांवर भाष्य करण्यात सिनेविश्वातील बरीच कलाकार मंडळी अग्रेसर असलेली पाहायला मिळतात. बरेचदा ही मंडळी सोशल मीडियावरुन व्यक्त होतात. अशातच या कलाकारांच्या यादीत एका अभिनेत्रीचे नाव आवर्जून घेतले जाईल ते म्हणजेच मेघा धाडे. ‘बिग बॉस मराठी’ सीजन १ ची विजेती मेघा धाडे ही नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. बरेचदा ट्रोलर्सच्या कमेंटवर ती सडेतोडपणे भाष्य करत ट्रोलर्सला उत्तरही देताना दिसते. ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या सीझनमध्ये मेघा धाडेने उत्तम कामगिरी करत त्या पर्वाची ट्रॉफी कमावली. सोशल मीडियावर कायम सक्रिय असणाऱ्या या अभिनेत्रीने शेअर केलेल्या पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधले आहे. अभिनेत्रीने शेअर केलेली ही पोस्ट ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ वर भाष्य करणारी आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सध्या दोन गट पडलेले दिसत आहेत. दरम्यान कालच्या भागात जान्हवी व वर्षा उसगांवकर यांच्यात अगदी टोकाचं भांडण झालं. जान्हवीने यावेळी वर्षा यांचा केलेलं अपमान पाहून संबंध महाराष्ट्र पेटून उठला आहे.

“ही फाल्तूची ओव्हरअ‍ॅक्टिंग नका करु. ज्यांनी पुरस्कार दिला त्यांना आता पश्चाताप होत असेल यांना आपण पुरस्कार का दिले? कारण, बाहेर अनेक चांगले-चांगले अभिनेते आहेत. त्यांना पुरस्कार मिळाले नाहीत पण, तुम्हाला दिला”, अशा शब्दात अपमान करताच मेघा धाडे हिने खरमरीत पोस्ट लिहीत जान्हवीला टोला लगावला आहे. मेघाने पोस्ट शेअर करत, “माझ्या लाडक्या ‘बिग बॉस मराठी’च्या प्रेक्षकांनो ही आगाऊ कार्टी जान्हवी नॉमिनेशनला आलीच तर तिला सोडू नका. तिला बाहेरचा रस्ता नक्की दाखवा. ही माझी कळकळीची विनंती आहे. ‘बिग बॉस मराठी’ची सर्वांत वाईट स्पर्धक जान्हवी किल्लेकर”, असं म्हणत तिच्यावरील राग व्यक्त केला आहे.

आणखी वाचा – “परवापर्यंत आम्ही भेटत-बोलत होतो आणि…”, विजय कदम यांच्या निधनानंतर प्रशांत दामलेंना मोठा धक्का, म्हणाले, “आजारी होता पण…”

तर आणखी एक पोस्ट शेअर करत तिने, “मला अजूनही आठवतंय की, हिंदी ‘बिग बॉस’मध्ये सलमान खान सरांनी प्रियांका जग्गा व स्वामी ओम यांना ‘बिग बॉस’च्या घरातून त्यांनी केलेल्या चुकीच्या वागणुकीबद्दल बाहेर काढलं होतं. आता आम्हाला रितेश देशमुख सरांकडून सुद्धा हीच अपेक्षा आहे. तुम्ही याबद्दल नक्की काहीतरी बोला. काही स्पर्धकांप्रती जान्हवी किल्लेकरचं असं वागणं अत्यंत चुकीचं आहे. रितेश सर, प्लीज तिला बाहेर हाकलून द्या. आम्हाला असे लोक घरात नको आहेत. ही माझी कळकळीची विनंती आहे”, असंही म्हटलं आहे.

आणखी वाचा – Vijay Kadam Death : शेवटच्या दिवसांमध्ये असे दिसत होते विजय कदम, कोणालाच होणारा त्रास कळू दिला नाही अन्…; निधनापूर्वी काय घडलेलं?

पुरस्कारावरुन झालेल्या अपमानावर मेघाने पोस्ट लिहीत, “महाराष्ट्र राज्याच्या वतीने देण्यात आलेल्या पुरस्कार यावर या पद्धतीच्या भाषेचा वापर झालेला आहे. त्याबाबत आज मान लाजेने खाली गेली. वर्षा ताई यांना फक्त अपमानाची होण्याकरिता या शोमध्ये आणले आहे असे वाटत आहे. हेच पुरस्कार मिळवण्यासाठी कित्येकांची हयात जाते. ज्येष्ठ कलाकार सचिन पिळगावकर, अशोक सराफ, उषा नाडकर्णी, सयाजी शिंदे, महेश कोठारे, प्रिया बेर्डे यांची व्यक्त केलेली नाराजी मनाला अजून चटका देणारी आहे. प्रशांत दामले, मोहन जोशी सर आपल्या डोळ्यातील पाणी बरेच काही सांगून गेले”, असे म्हटलं आहे.

Tags: bigg boss marathi 5jahnavi killekar trollmegha dhade angry post
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Vijay Kadam carrer journey

Vijay Kadam Death : मराठी नाटक, मालिका, चित्रपटांचे राजा होते अभिनेते विजय कदम, जाणून घ्या त्यांचा प्रवास व गाजलेल्या कलाकृतींच्या आठवणी

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.