शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

घटस्फोटानंतर लग्नाची साडी टाकून न देण्याचा सई ताम्हणकरचा निर्णय, त्याचाच शिवला ड्रेस, म्हणाली, “हा ड्रेस खूप जास्त स्पेशल…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 28, 2024 | 2:20 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sai Tamhankar On Her Wedding Dress

घटस्फोटानंतर लग्नाची साडी टाकून न देण्याचा सई ताम्हणकरचा निर्णय, त्याचाच शिवला ड्रेस, म्हणाली, "हा ड्रेस खूप जास्त स्पेशल..."

मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस व आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत एका अभिनेत्रीचं नाव आवर्जून घेतलं जातं ते म्हणजे अभिनेत्री सई ताम्हणकर. मराठीसह सईने बॉलिवूडमध्येही महत्त्वपूर्ण कामगिरी करत स्वतःच असं स्थान निर्माण केलं. रुपेरी पडद्यावर ती साकारत असलेल्या भूमिकांचं विशेष कौतुकही होताना दिसतं. अभिनेत्री सोशल मीडियावरही बऱ्यापैकी चर्चेत असलेली पाहायला मिळाली आहे. हटके व ग्लॅमरस फोटोशूटमुळे सई नेहमीच चर्चेत असते. तसेच सईचे खासगी आयुष्यही कोणापासून लपून राहिलेले नाही. (Sai Tamhankar On Her Wedding Dress)

सईच्या लग्न, अफेअर यांबाबतच्या अनेक बातम्या बरेचदा कानावर पडतात. स्वबळावर, स्वमहेनतीवर आणि कोणीही वारसा हक्क नसताना सईने सिनेसृष्टीत स्वतःच स्थान निर्माण केलं. व्यावसायिक आयुष्यात सईने बरीच प्रगती केली असली तरी तिचं खासगी आयुष्य तितकंसं चांगलं राहील नाही. असं असलं तरी सईने स्वकमाईवर तिचं मुंबईत आलिशान घर घेतलं आहे. सईच्या या आलिशान घराची सफर आपल्याला तिच्या युट्युब चॅनेलवरुन पाहायला मिळाली. दरम्यान, ‘Hauterrfly’ या युट्युब चॅनेलला सईने मुलाखत दिली. यावेळी तिने तिच्या कपाटातील खास कपड्यांबद्दलच्या आठवणी शेअर केल्या.

आणखी वाचा – Hina Khan Cancer : हिना खानला स्तनाचा कर्करोग, आता अशा परिस्थितीमध्ये आहे अभिनेत्री, म्हणाली, “तिसरी स्टेज सुरु आहे आणि…”

View this post on Instagram

A post shared by Sai (@saietamhankar)

समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये असं पाहायला मिळत आहे की, सईनं तिच्या वार्डरॉबमधून एक खास ड्रेस काढला. तो ड्रेस दाखवत ती म्हणाली, “ही माझी लग्नाची साडी होती, ती मला टाकून द्यायची नव्हती,त्यामुळे मी हा चुडीदार ड्रेस शिवून घेतला आहे. भारतातील मोठा डिझायनर सब्यसाची याने ही साडी डिझाइन केलेली आहे”, असंही ती म्हणाली. पुढे ती म्हणाली, “अशा नाजूक साड्या कपाटात ठेवून ठेवून आणि मुंबईच्या दमट वातावरणात नंतर खराब होतात. पण हा ड्रेस मी कितीही वेळा रिपीट करु शकते. अर्थात हा ड्रेस माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल आहे”, असं ती म्हणाली.

आणखी वाचा – Video : मुग्धा वैशंपायनचं सासरकडचं घर आतून आहे असं, प्रवेश करताच दत्तगुरुंचं छोटं मंदिर, प्रसन्न वातावरण अन्…; व्हिडीओ व्हायरल

अमेय गोसावी या व्यक्तीशी सईचं लग्न झालं होतं. मात्र तिचं हे लग्न फार काळ टिकलं नाही. सईच्या पहिल्या लग्नाबद्दल बोलायचे झाले तर, अमेयला तीन वर्षे डेट केल्यानंतर सईनं लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि ७ एप्रिल २०१२ रोजी त्यांनी साखरपुडा केला. त्यानंतर १५ डिसेंबर २०१३ रोजी सई व अमेयने लग्न केलं होतं. मात्र त्यांनतर त्यांनी काही वर्षातच घटस्फोट घेतला. असं असलं तरी सई व अमेय चांगले मित्र आहेत असं सई अनेकदा मुलाखतींमध्ये बोलली आहे.

Tags: marathi actresssai tamhankarSai Tamhankar On Her Wedding Dresssai tamhankar wedding dress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Aadesh Bandekar shared a video of having darshan of Dnyaneshwar Mauli in Alandi and Sant Tukaram Maharaj in Dehu and donating food.

Video : आळंदी-देहू पोहोचताच वारकऱ्यांनी सेल्फीसाठी घेरलं, आदेश बांदेकरांनी दिलेली वागणूक पाहून सगळेच भारावले, अन्नदानही केलं अन्...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.