काही दिवसांपूर्वी मराठी चित्रपटसृष्टीमधील अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन झालं आणि मनोरंजन सृष्टीसह संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली. रवींद्र महाजनी यांच्या मृत्यूचं कोडं ही न उलगडणार आहे. आंबी गावात एका बंद घरात त्यांचा मृतदेह सापडला अशी माहिती पोलिसांनी दिली. रवींद्र महाजनी त्यांच्या मृत्यू समयी एकटेच होते. त्यांचा मुतुय कसा झाला या बद्दल देखील एक प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली होती.(gashmeer mahajani on father death)
रवींद्र महाजनी यांचा मुलगा आणि अभिनेता गश्मीर महाजनी या वेळी कुठे होता? वडिलांपासून कुटुंब लांब का होते? अशा अनेक प्रश्नांवर गश्मीरला ट्रोल देखील केले जाऊ लागले. रवींद्र महाजनी (ravindra mahajani) यांच्या निधनानंतर कुटुंबावर होणाऱ्या उत्तराला आता अखेर गश्मीरने उत्तर दिलं आहे.
इंस्टाग्राम अकाउंट वरून स्टोरी पोस्ट करत गश्मीर ने लिहिलंय “अभिनेता हा कायमच अभिनेता असतो. या प्रकरणानंतर मी, माझ्या कुटुंबाने, जवळच्या व्यक्तींनी मौन बाळगणं पसंत केलं. आम्ही शांत राहिल्याने अनेक जण द्वेष करत आहेत, शिव्याही देत आहे आणि आम्ही त्याचंही स्वागतच करतो. आपल्यातून निघून गेलेल्या त्या आत्म्याला देव शांती देवो. ओम शांती. ते माझे वडील होते आणि माझ्या आईचे पती होते. आम्ही त्यांना तुमच्या सर्वांपेक्षा जास्त चांगलं ओळखतो. भविष्यात कधीतरी वेळ आल्यावर मी याबद्दल नक्कीच व्यक्त होईन.”

अखेर गश्मीरने दिलं नेटकऱ्यांना उत्तर(gashmeer mahajani)
वडिलांच्या जाण्याने महाजनी कुटुंब यांच्यावर होणाऱ्या या टीकेला गश्मीरचंने हे उत्तर दिलं आहे. रवींद्र महाजनी यांनी अनेक मराठी चित्रपटामध्ये काम करून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. एकेकाळी मराठी चित्रपट सृष्टीतील विनोद खन्ना अशी त्यांची ओळख होती. मुंबईचा फौजदार, लक्ष्मी, देवता, देऊळ बंद, पानिपत अशा अनेक चित्रपटांमध्ये काम करून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर अनेक कलाकारांनी देखील त्यांच्या सोबतच्या काही आठवणींना उजाळा दिला होता.
अभिनेता सुबोध भावने रवींद्र महाजनी यांची खास आठवन सांगितली होती. रवींद्र यांचा एक फोटो पोस्ट करत सुबोधने लिहिलेलं “मराठी चित्रपटातील माझं व्यावसायिक अभिनेता म्हणून पहिलं पाऊल रविंद्र महाजनी यांनी निर्मिती आणि दिग्दर्शन केलेल्या “सत्तेसाठी काहीही” या चित्रपटातून पडले. अतिशय रूबाबदार, विलक्षण देखणे, खऱ्या अर्थाने मराठी मधील handsome नायक , कायम हसतमुख अशीच तुमची प्रतिमा कायम मनात कोरली गेली आहे. दादा तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली ” तर अनेक कलाकारांनी देखील रवींद्र यांना श्रद्धांजली वाहिली होती.