शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा अडकले लग्नबंधनात, तेलुगू पद्धतीने उदयपूरमध्ये पार पडला सोहळा, मिठाई वाटली

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 26, 2026 | 3:47 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Rashmika Vijay Wedding

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा अडकले लग्नबंधनात, तेलुगू पद्धतीने उदयपूरमध्ये पार पडला सोहळा, मिठाई वाटली

Rashmika Vijay Wedding : रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा आता गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड राहिले नाहीत. आता दोघेही पती-पत्नी झाले आहेत. अनेक वर्षांच्या प्रेमानंतर आता या जोडप्याचा नवा पर्व सुरु झाला आहे. वर्षानुवर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांनी गुरुवारी लग्न केले. कोलाहलापासून दूर उदयपूरच्या रॉयल वेडिंग फंक्शनमध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली. रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा आज दोनदा लग्न करणार आहेत. विजयच्या बाजूने तेलुगू रितीरिवाजानुसार लग्न झाले आहे आणि रश्मिकाच्या बाजूने कोडावा समारंभ काही वेळांतच पार पडेल. सध्या रश्मिका आणि विजय यांचे तेलुगू रितीरिवाजानुसार लग्न पार पडले आहे.

व्यापार विश्लेषक श्रीधर पिल्लई यांनी X हँडलवर रश्मिका आणि विजयच्या लग्नाशी संबंधित अपडेट शेअर केले आहेत. त्यांनी लिहिले, “अखेर विजयने आज सकाळी १०.१० वाजता रश्मिकासोबत लग्न केले. तुम्हा दोघांचे खूप खूप अभिनंदन”. लग्नानंतर, त्यांच्या कुटुंबीयांनी लग्नाच्या ठिकाणाबाहेर पापाराझींना मिठाईचे वाटप केले. तेलगू रितीरिवाजांनंतर आता रश्मिका मंदान्ना कोडावा रितीरिवाजानुसार लग्न करणार आहे. हा सूर्यास्त विवाह आहे जो दुपारी चार वाजता होणार आहे.

आणखी वाचा – “बिल भरलं नाहीतर कनेक्शन कट”, मराठी अभिनेत्याची फसवणूक, पत्नीला फ्रॉड कॉल आला आणि…

View this post on Instagram

A post shared by Pallav Paliwal (@pallav_paliwal)

सध्या नवविवाहित वधूच्या लग्नाची झलक अद्याप समोर आलेली नाही. चाहते त्यांच्या लग्नाच्या फोटोंची आतुरतेने वाट पाहत आहेत. रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाचे विधी चार दिवस आधीच सुरु झाले होते. स्पोर्ट्स गेमने सुरु झालेला विवाह सोहळा हळदी आणि संगीताने संपला. संध्याकाळी लग्नानंतर दोघांची ग्रँड रिसेप्शन पार्टी आयोजित केली जाईल.

Tags: rashmika mandannarashmika mandanna and vijay devarkonda weddingvijay devarkonda
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Vijay Deverakonda And Rashmika Mandanna Wedding

रश्मिका मंदान्ना-विजय देवरकोंडाच्या लग्नानंतर कलाकारांनीही दिल्या शुभेच्छा, क्रिती सेनॉन ते विद्या बालनच्या कमेंट्स…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.