रविवार, एप्रिल 26, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मी त्यांच्यापासून हजारो मैल दूर आहे पण…”, अशोक सराफांच्या वाढदिवसानिमित्त लेकाची भावुक पोस्ट, म्हणाला, “त्यांच्या माणुसकीचं…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 5, 2025 | 2:54 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Ashok Saraf Son

"मी त्यांच्यापासून हजारो मैल दूर आहे पण...", अशोक सराफांच्या वाढदिवसानिमित्त लेकाची भावुक पोस्ट, म्हणाला, "त्यांच्या माणुसकीचं..."

Ashok Saraf Son : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना नुकताच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अभिनयसृष्टीतील त्यांच्या भरीव योगदानाबाबत त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर संपूर्ण कलाविश्वातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे. दिल्ली येथे झालेल्या या सन्मान सोहळ्यात त्यांची पत्नी निवेदिता सराफ, भाऊ आणि जवळचे कुटुंबीय उपस्थित होते. मात्र या सोहळ्याला त्यांचा लेक अनिकेत सराफ उपस्थित राहू शकला नाही. या आनंदाच्या बातमीनंतर काल अशोक मामांचा वाढदिवस झाला. यावेळीही सर्वांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त त्यांची पत्नी निवेदिता यांनीही भावना मांडल्या.

यापाठोपाठ आता अशोक सराफ यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या लेकानेही वडिलांसाठी खास पोस्ट लिहिली आहे. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झाल्यानंतर त्यांच्यासाठी अभिमानास्पद अशी पोस्ट आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा पोस्टद्वारे दिल्या आहेत. या पोस्टद्वारे त्याने ‘बाबांचा खूप अभिमान वाटतोय’ असं म्हटलं आहे. शिवाय पद्मश्री सोहळ्याला तो येऊ शकला नाही मात्र त्याने हा सोहळा लाईव्ह प्रेक्षेपणाद्वारे पाहिला असल्याचं म्हटलं. अनिकेत कामानिमित्त सध्या परदेशात आहे. त्यामुळे तो वडिलांच्या या खास क्षणाला उपस्थित राहू शकला नाही.

आणखी वाचा – बंगळुरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू अन्…; विराट कोहली पाठोपाठ अनुष्का शर्माची प्रतिक्रिया, म्हणाली…

View this post on Instagram

A post shared by Nick Saraf (@nicksaraf)

अनिकेत सराफ लिहितो, “मला आजही आठवतंय. माझ्या वडिलांना महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च सन्मान म्हणजेच महाराष्ट्रभूषण पुरस्कार साधारण वर्षभरापूर्वी प्रदान करण्यात आला होता. त्यावेळी मी प्रचंड आनंदी झालो होतो, मला त्यांचा खूप अभिमान वाटत होता. तो भव्य क्षण कोणीच शब्दांत व्यक्त करू शकणार नाही असाचं होता आणि आता पुन्हा एकदा बाबांमुळे माझा आनंद द्विगुणित झाला आहे. आज मी त्यांच्यापासून हजारो मैल दूर आहे पण, लाइव्ह ब्रॉडकास्टवर संपूर्ण पद्मश्री सोहळा पाहताना मन भरुन आलं”.

आणखी वाचा – “थोडीतरी लाज बाळगा”, ६६ वर्षीय नीना गुप्तांनी ओलांडल्या वयाच्या मर्यादा, बोल्ड लूक पाहून नेटकरी भडकले, म्हणाले, “म्हातारपणात…”

पुढे त्याने म्हटलं आहे की, “त्यांना पद्मश्री पुरस्कार स्वीकारताना पाहून खरंच खूप अभिमान वाटला. म्हणूनच या खास दिवशी मी माझ्या वडिलांना खूप-खूप शुभेच्छा देतो. त्यांच्या कामाचं, अभिनयाचं कौतुक सगळेच करतात मात्र, आज मी अशोक सराफांमधले प्रेमळ वडील अन् त्यांच्या माणुसकीचं विशेष कौतुक करतो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला खूप-खूप प्रेम आणि शुभेच्छा!”.

Tags: ashok sarafentertainmentmarathi actor
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 air conditioner health risks
Lifestyle

AC Side Effects : उन्हाळ्यात AC चा अतिवापर आरोग्यासाठी घातक, थकवा, डोकेदुखी आणि…

एप्रिल 26, 2026 | 4:00 pm
 Arijit Singh Net Worth
Entertainment

आलिशान कार, अपार्टमेंट आणि…; बॉलिवूड गायकाकडे आहे करोडो रुपयांची मालकी, लाइव्ह कॉन्सर्टसाठी घेतो मोठी रक्कम

एप्रिल 26, 2026 | 11:00 am
Raj Sharma Passes Away
Entertainment

प्रसिद्ध कॉमेडियनचे वयाच्या ५०व्या वर्षी निधन, बऱ्याच दिवसांपासून होते रुग्णालयात, मृत्यूचे कारण अस्पष्ट

एप्रिल 25, 2026 | 1:12 pm
Biplab Dasgupta death
Entertainment

वयाच्या ७५व्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, रुग्णालयात नेतानाच वाटेत मृत्यू, सिनेसृष्टीवर शोककळा

एप्रिल 25, 2026 | 11:58 am
Next Post
adhyayan suman on nepotism

वडील सुपरस्टार तरीही कामासाठी वणवण; शेखर सुमन यांच्या लेकाची खंत, म्हणाला, “दोष इंडस्ट्रीला देऊ का?”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.