शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या आईचं निधन, कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, पोस्ट शेअर करत म्हणाला, “तिच्या नसण्याने…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 17, 2024 | 12:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Amit Khedekar Mother Death

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या आईचं निधन, कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, पोस्ट शेअर करत म्हणाला, "तिच्या नसण्याने…"

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक झाला आहे. १५ मे बुधवार रोजी अमित यांच्या आईचे निधन झाले. गेले कित्येक दिवस त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या. अखेर त्यांची या आजाराशी सुरु असलेली झुंज संपली असून त्यांनी वयाच्या ६०व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अमितने आईच्या निधनाची बातमी सोशल मीडियाद्वारे पोस्ट शेअर करत सांगितली. आईच्या निधनाने अमितवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (Amit Khedekar Mother Death)

आईच्या निधनानंतर अमितला दुःख सहन होत नाही आहे. सोशल मीडियाद्वारे आईच्या निधनाची पोस्ट शेअर करत त्याने भावना व्यक्त केल्या आहेत. अमितच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्यांचं सांत्वन केलं आहे. अमितने सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करताच त्याला अनेकांनी धीर दिला आहे. पोस्ट शेअर करत अमितने असं म्हटलं आहे की, “हे सांगताना अत्यंत दुःख होत आहे की माझी आई सौ. सुनिता खेडेकर, १५ मे रोजी, रात्री १२.५० च्या सुमारास वयाच्या ६०व्या वर्षी या जगातून कायमची निघून गेली आहे. ती गेल्या काही काळापासून कर्करोगाशी झुंज देत होती”.

आणखी वाचा – अधिपती अक्षराच्या प्रेमात बेधुंद, मास्तरीणबाई देतील का प्रेमाची कबुली?, दोघांमधील प्रेम फुलणार का?

View this post on Instagram

A post shared by Ameet Khedekar (@ameetkhedekar)

पुढे त्याने असं म्हटलं आहे की, “ती माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी सर्वस्व होती. तिच्या निधनाने माझे पूर्ण कुटुंबीय दुःखाच्या छायेत आहे. तिच्या जवळच्या लोकांपलीकडे ही माझ्या आईचा प्रेमळ प्रभाव आमच्या व्यापक समुदायावर पसरला आहे. ती नेहमी गरजूंना मदतीचा हात देण्यासाठी, अडचणी ऐकून घेण्यासाठी, दुःखात गरजूंना खांदा देण्यासाठी तयार असायची. तिच्या दयाळूपणाच्या आणि उदारतेच्या निःस्वार्थ कृत्यांनी अनेकांच्या जीवनाला स्पर्श केला आणि तिच्याबरोबर संपर्कात आलेल्या सर्वांवर एक अमिट छाप सोडली”.

आणखी वाचा – चैतन्य-अर्जुनच्या भेटीबद्दल साक्षीला कळलं, मधुभाऊंना महीपतपासून अर्जुन-सायली सुरक्षित ठेवणार का?, दोघेही सहमताने एकत्र राहणार का?

“खरंतर तिच्या नसण्याने आमच्या आयुष्यात जी पोकळी निर्माण झाली आहे त्याचे वर्णन शब्दात करु शकत नाही. या कठीण काळात आमच्याबरोबर असलेल्या तुम्हा सर्वांचे आम्ही ऋणी आहोत. तिच्या आत्म्यास शांती लाभो हीच प्रार्थना”, असंही तो म्हणाला. अमितने आजवर अनेक मालिका व चित्रपटांमधून महत्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

Tags: amit khedekarAmit Khedekar Mother Deathamit khedekar mother passed awaymarathi actor
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Anushka sharma troll after banglore stampede
Entertainment

“खोटं रडू नकोस, इतके पैसे कमावले पण…”, बंगळूर चेंगराचेंगरीवर पोस्ट करताच अनुष्का शर्मा ट्रोल, नेटकऱ्यांचा संताप

जून 6, 2025 | 2:30 pm
 Celebs Live In Rented Houses
Entertainment

कोट्यवधी कमावतात तरीही कलाकार भाड्याच्या घरात का राहतात?, कारण ऐकून व्हाल थक्क, जाणून घ्या…

जून 6, 2025 | 1:30 pm
Next Post
rakhi sawant tumor surgery

राखी सावंतच्या गर्भाशयामध्ये १० सेमीचा ट्युमर, अभिनेत्रीवर लवकरच मोठी शस्त्रक्रिया, म्हणाली, "मी कधीही हार मानली नाही पण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.