मिलिंद गवळी यांना आपण आजपर्यंत बऱ्याच भूमिका साकारताना पाहिलं आहे. त्यांनी हिंदी, मराठी मालिकांमध्ये तसेच चित्रपटांमध्येही विविध भूमिका साकारल्या आहेत. सध्या ते ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमध्ये नकारात्मक भूमिका साकारत आहे. ते साकारत असलेल्या भूमिकांचा वेगळा असा चाहतावर्ग आहे. प्रेक्षकांच्या बऱ्याच पसंतीस पडतात. सोशल मीडियावर मिलिंद बरेच सक्रिय असतात. ते नेहमी फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक गोष्टीचं कुतुहल प्रेक्षकांना वाटतं. आणखी एक गोष्ट जाणून घ्यायाला प्रेक्षक उत्सुक असतील ते म्हणजे त्यांचं घरं.(Milind home tour)
प्रत्येकाला आपलं घर खूप महत्त्वाचं असतं. त्यांच्याशी आपल्या बऱ्याच आठवणी जोडल्या गेलेल्या असतात. तशाच आठवणी मिलिंद यांच्याही जोडल्या गेल्या आहेत. मुंबईत स्वतःचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. तसं त्यांचही स्वप्न होतं. सुरुवातीला ते सरकारी वसाहतींमध्ये राहत होते. त्यानंतर भाड्याच्या घरातून प्रवास करत आता त्यांनी अंधेरीत स्वतःचं घर घेतलं आहे. छान इंटेरियर, सुंदर व आकर्षक वस्तू यांच्या मांडणीतून त्यांनी आपलं घर सजवलं आहे. पण खरंतर त्यांची स्वप्नातील घराची संकल्पना काही वेगळी होती.
वाचा – मिलिंद यांच्या स्वप्नातील घर आहे कसं?(Milind home tour)
घराची संकल्पना सांगताना ते म्हणाले, “माझं स्वप्नातलं घर म्हणजे अगदी प्रशस्त परिसर. एक घर, समोर छान तुळशी वृंदावन, समोर अंगण, अंगणात झाडं, समोर पाण्याचा झरा पण ही संकल्पना मुंबईत साकारणं अगदी कठीण. म्हणून हे जे आहे ते आपलं आहे असं समजणं महत्त्वाचं आहे. इथे माझे बाबा राहतात. वडिल हे माझं वटवृक्ष आहेत.त्यांच्यामुळे या घराला घरपण आहे. आमची दोन घरं आहेत एक ठाण्याला व दुसरं हे अंधेरीत.
पण ह्या अंधेरीतल्या घरात बाबांमुळे घरपण आहे. त्यांनी इथल्या नव्या संकल्पनेशी जुळवून घेतलं म्हणून या भिंतींना घरपण आहे”.
मिलिंद यांनी मराठी सिनेसृष्टीत आपली वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिकांचं प्रेक्षकांकडून नेहमीच कौतुक होत असतं. त्यांच्या या घराचीही गोष्ट अगदी प्रेरणादायी आणि कौतुकास्पद आहे.