Majjacha Adda with Atisha Naik : माणूस म्हटल्यावर त्याचा विविधांगी स्वभाव हा आलाच. अशाच विविध स्वभावाची माणसं सिनेसृष्टीत वावरत असताना आपण नेहमीच पाहतो. एखाद्या कलाकाराच्या अंगी असलेला स्वभाव हा त्याचा मूळचा स्वभाव आहे की, एखाद्या उध्दभवलेल्या परिस्थितीमुळे तो स्वभाव त्याच्या अंगी आलेला आहे, हे सहसा कळतं नाही. असच काहीस कानावर ऐकू येत ती म्हणजे अभिनेत्री अतिशा नाईक. (Atisha Naik On Her Nature)
अतिशा नाईक हिने आजवर छोटा पडदा गाजवला आहे. खलनायिकेच्या भूमिकेत अतिशाने उत्तमोत्तम भूमिका साकारल्या. पण बरेचदा तिच्या फटकळ स्वभावद्दल बोललं जात, भूमिकेनुसार ती खऱ्या आयुष्यात ही फटकळ आहे असं बोललं जात. पण हा तिचा मूळचा स्वभाव आहे का परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी ती वापरत असलेला स्वभाव आहे. याबाबत तिने इट्स मज्जाच्या ‘मज्जाचा अड्डा’ या कार्यक्रमादरम्यान खुलेपणाने भाष्य केलं.
अतिशा नाईक फटकळ स्वभावाची आहे, यावर तू काय सांगशील? असा प्रश्न अतिशा नाईक हिला विचारला असता, तिने यावर उत्तर देत म्हटलं, “फटकळ स्वभाव आहे की आणखी काही हे तुम्ही कोणता चष्मा लावला आहे यावर कळतं. माझ्या नात्यागोत्यातील नसणाऱ्या एखाद्या माणसाने मला त्रास दिला तर मी का त्याची खैर ठेवू. गर्दीतून चालताना मला एखाद्याचा लागलेला धक्का हा चुकून लागला होता की मुद्दामहून यावर काय प्रतिक्रिया द्यायची हे ठरत. समोरच्याने तेव्हा सॉरी जरी म्हटलं असलं तरी ते बोलताना त्याच्या नजरेतून जर एक स्त्री म्हणून त्याने औकात दाखवली आहे हे कळालं तर मी प्रतिक्रिया देणार. त्यामुळे माझ्या अंगातअंगात हिंसा रुजली आहे, किंवा मला कोण त्रास देत, मला कोणाचा त्रास होतोय, हे त्या व्यक्ती पुरतंच मर्यादित असतं.”
“माझं वड्याचं तेल कधीही वांग्यावर निघत नाही. मी स्पष्ट बोलते, आता समोरच्याने त्याला स्पष्ट म्हणायचं की,फटकळ म्हणायचं, की उद्धट उर्मट म्हणायचं, हे त्याच्या मानसिकतेवर ठरत. मी इंडस्ट्रीत, माझ्या आयुष्यात सगळ्यांना मित्र-मैत्रीण बनवायला आलेले नाही, आणि तसेच सगळ्यांशी शत्रुत्व ही घ्यायला आलेले नाही. ज्यांना मी माहित आहे ते थांबतात. गर्दीत खूप माणसं असतात,” असं म्हणून अतिशा यांनी त्यांच्या फटकळ स्वभावाबद्दल परखड मत मांडलं.