काही व्यक्ती ज्या प्रमाणे नेहमी आनंद देत असतात त्याच प्रमाणे काही कार्यक्रम ही नित्यनियमांन हेच काम गेले कित्येक दिवसांपासून करत आले आहेत. काही कुटुंबांमध्ये हे कार्यक्रम पाहिल्याशिवाय जेवण जात नाही, तर काहींना मानसिक तणावणातून रिलीफ मिळावी म्हणून सुद्धा या कार्यक्रमांची मदत होते. याच कार्यक्रमांच्या यादितील एक कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्राची हास्य जत्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा घरोघरी एखादा सदस्य असावा असा राहत असलेला कार्यक्रम.(Chetna Bhat Mandar Cholkar)
या कार्यक्रमात असलेला प्रत्येक कलाकार प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी वेढावेलेला दिसतो. हास्याच्या जत्रेत येणार प्रत्येक पाहून या मंचाचा एक भाग होऊन जातो. असच काहीस घडलं जेव्हा हास्यजत्रेच्या मंचावर अभिनेत्री चेतना भटचे पती आणि प्रसिद्ध गीतकार मंदार चोळकर यांनी हजेरी लावली होती. त्यानिमित्त चेतना ने सोशल मीडियावर मंदार साठी एक भावुक पोस्ट लिहिली आहे. पोस्ट मध्ये चेतना ने लिहिलं आहे ‘ MHJ चा जावई MHJ मधे फुलराणी च्या प्रोमोशन साठी… मला नेहमी सपोर्ट करणारा आणि ज्याचा मला आणि मला ज्याचा नेहमी अभिमान आणि कौतुक असतं असा माझा नवरा..’

आपण जिथे काम करतो त्या मंचावर आपलं कोणी येत तेव्हा कलाकाराच्या मनात होणार आनंद काय असतो हे चेतनाने पोस्ट केलेल्या फोटोज मध्ये ठळकपणे दिसत आहे. चेतना आणि मंदारची सुंदर जोडी पाहून चाहत्यांनी या पोस्ट वरून भरभरून कमेंट्स करत या दोघांचं कौतुक केलं आहे.(Chetna Bhat Mandar Cholkar)
====
हे देखील वाचा – अशोक मामांना जीवनगौरव, पण लक्ष्याच्या आठवणीत फॅन्स भावुक
====
महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत दिवसेंदिवस चेतनाचा अभिनय भरताना दिसत आहे. विशेष करून समीर चौघुले आणि गौरव मोरे यांच्या सोबत चेतना ने साकारलेले स्किट्स प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडताना दिसतात. आपल्या हटके शैलीमुळे चेतनाने चाहत्यांचं भरभरून प्रेम मिळवलं आहे. प्रेक्षकांकडून देखील चेतनच्या कामाचं तोंडभरून कौतुक केलं जातंय. चेतना ने पोस्टच्या शेवटी मिळालेल्या संधी बद्दल निर्माते सचिन गोस्वामी, सचिन मोटे यांचे देखील आभार मानले आहेत.