शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आठ महिन्यांनी मराठमोळ्या अभिनेत्रीने दाखविला लेकाचा चेहरा, हुबेहूब आईसारखाच दिसतो आणि…; लूक पाहून नेटकरी हैराण

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 11, 2025 | 12:02 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
neha gadre baby boy face reveal

आठ महिन्यांनी मराठमोळ्या अभिनेत्रीने दाखविला लेकाचा चेहरा, हुबेहूब आईसारखाच दिसतो आणि…; लूक पाहून नेटकरी हैराण

neha gadre baby boy face reveal : सिनेविश्वात अशी अनेक कलाकार मंडळी ज्यांनी मराठी मालिकांमध्ये एक काळ गाजवला आणि त्या अचानक मालिकाविश्वातून गायब झाल्या. बऱ्याच अभिनेत्रींनी अभिनय क्षेत्राला राम राम करत घर, संसार, मुलांकडे लक्ष दिलं. तर काहींनी ब्रेकनंतर काही वर्षांनी पुन्हा एकदा कमबॅक केलं. काही अभिनेत्री अशाही आहेत ज्यांनी मनोरंजनसृष्टीपासून दूर राहत आपापल्या संसाराला लागल्या आहेत. मराठी इंडस्ट्रीपासून दूर जाऊन परदेशात स्थायिक झालेली अशीच एक अभिनेत्री म्हणजे नेहा गद्रे. नेहाने मालिकांचा एक काळ गाजवला मात्र लग्नानंतर तिने भारताला बाय बाय करत परदेश गाठलं.

नेहा सध्या ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक आहे. लग्नानंतर ती तिच्या नवऱ्यासह परदेशात स्थायिक झाली. सिनेविश्वात कार्यरत असताना नेहाने ‘मन उधाण वाऱ्याचे’, ‘अजूनही चांद रात आहे’ या मालिकांमध्ये साकारलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकांमुळे नेहा चर्चेत आलेली पाहायला मिळाली. ‘मोकळा श्वास’ या चित्रपटामुळे तिला खऱ्या अर्थाने सिनेसृष्टीत नाव मिळालं, या मालिकेतील तिची भूमिका बरीच गाजली. २ मार्च २०१९ रोजी नेहाने ईशान बापटशी लग्न केले आणि ती कायमची परदेशात ऑस्ट्रेलिया येथे स्थायिक झाली.

आणखी वाचा – करवा चौथच्या दिवशी मशिदीतील फोटो पोस्ट करणं पडलं महागात, सोनाक्षी सिन्हाच्या पतीबरोबरचे फोटो व्हायरल, नेटकरी भडकले…

View this post on Instagram

A post shared by NEHA GADRE ❤ (@nehagadre12)

गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिनाऱ्यावर बेबी बंपसह तिने फोटो शेअर करत आनंदाची बातमी दिली. याशिवाय बेबी शॉवरला तिने जेंडरही रिव्हील केलं. त्यानंतर काही महिन्यांतच ती आई झाली आणि तिने मुलाला जन्म दिला. नेहा गद्रेने तिच्या बाळाचं नाव इवान असं ठेवलं. १० फेब्रुवारीला इवानचा जन्म झाला होता. यानंतर बरोबर ८ महिन्यांनी अभिनेत्रीने तिच्या मुलाचा चेहरा सोशल मीडियावर रिव्हिल केला आहे.

आणखी वाचा – शरीर काळं-निळं पडलं आणि…; अभिनेत्याच्या मृत्यूवर मित्र आणि कुटुंबीयांचा धक्कादायक दावा, मृत्यूस डॉक्टरांना जबाबदार धरले

“भेटा आमच्या चिमुकल्या बाळाला… हॅलो इवान. आज आमचं बाळ ८ महिन्यांचं झालं आहे…” असं कॅप्शन देत नेहाने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. नेहाच्या चाहत्यांसह मराठी सेलिब्रिटींनी तिच्या या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Tags: marathi actressneha gadreneha gadre baby boy
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
mayuri wagh separation news

"प्रेमात होते म्हणून विचार न करताच लग्न केलं", घटस्फोटाबाबत मयुरी वाघ पहिल्यांदाच बोलली, म्हणाली, "मी विश्वास ठेवला तीच व्यक्ती…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.