शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

इंडस्ट्रीमध्ये चाललंय तरी काय?, अभिनेत्रींबरोबरच पुरुष कलाकारांचेही होत आहे लैंगिक शोषण, लोकप्रिय अभिनेत्याचे गंभीर आरोप

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 31, 2024 | 11:57 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Male actor accuses filmmaker Ranjith of sexual harassment and assault case filed

चित्रपट निर्माते रणजीत यांच्यावर अभिनेत्याने केला लैंगिक शोषणाचा आरोप, ऑडिशनसाठी हॉटेलमध्ये बोलावलं अन्...

गेल्या काही दिवसांपासून मल्याळम चित्रपटसृष्टी चांगलीच चर्चेत आली आहे. या इंडस्ट्रीत सध्या तणाव दिसून येत आहे. कारण अनेक महिला कलाकारांनी आपल्या सहकलाकारांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. हेमा समितीचा अहवाल समोर आल्यानंतर या इंडस्ट्रीत एकच खळबळ उडाली आहे. यानंतर अनेक महिलांनी त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराचा खुलासा करण्यास सुरुवात केली आहे. या इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्री आरोप धक्कादायक खुलासे करत आहेत. मात्र यावेळी एका तरुण अभिनेत्याने चित्रपट निर्माता रणजीत यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. केरस पोलिसांच्या हवाल्याने एएनआयला ही माहिती देण्यात आली असून त्याच्याविरोधात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. (Actor Accuses Sexual Aarassment Case)

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, रणजीतने पीडित व्यक्तीला ऑडिशनसाठी बेंगळुरूमधील एका हॉटेलमध्ये बोलावले होते. पण तिथे अभिनेत्याला मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. रणजीतने त्याला त्याचे सर्व कपडे काढण्यास सांगितले आणि नंतर मारहाण केली. पीडित व्यक्तीला वाटले की, त्याला ऑडिशनसाठी बोलावले आहे, पण नंतर खरी परिस्थिती त्याच्या लक्षात आली. पीडित व्यक्तीने असाही दावा केला आहे की, घटनेच्या दुसऱ्या दिवशी रणजीतने अभिनेत्याला पैशांची ऑफरही दिली होती. केरळ पोलिसांचा हवाला देत, एएनआयला सांगण्यात आले की अभिनेत्याने डीजीपी (पोलीस महासंचालक) यांच्याकडे तक्रार केली आहे, या प्रकरणाची एसआयटी चौकशी होणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Ranjith Balakrishnan (@balakrishnan_ranjith)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “त्याच्यावर माझा विश्वासच नाही” अंकिता-अभिजीतमध्ये फुट, कशावरुन झाले मतभेद?

न्यायमूर्ती हेमा समितीच्या अहवालानंतर केरळ सरकारने अशा प्रकरणांची चौकशी करण्यासाठी विशेष टास्क फोर्सची स्थापना केली आहे. ज्यामध्ये ४ महिला पोलीस अधिकारीही आहेत. मल्याळम चित्रपट दिग्दर्शक रणजीत यांच्यावर यापूर्वीही आरोप झाले होते. काही दिवसांपूर्वी एका बंगाली अभिनेत्रीने त्यांच्यावर आरोप केले होते. तिने सांगितले की २००९ मध्ये त्याने तिला एका चित्रपटाच्या ऑडिशनसाठी बोलावले होते आणि तिच्याबरोबर गैरवर्तन केले होते. यानंतर रणजीतने केर फिल्म अकादमीचा राजीनामा दिला.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : वर्षा उसगांवकरांनी मिळविला नवीन कॅप्टन पदाचा बहुमान, ‘ते’ सदस्य ठरले किंगमेकर

दरम्यान, मल्याळम चित्रपटसृष्टीही उत्तमोत्तम आशयघन चित्रपटांची निर्मिती करण्यासाठी ओळखली जाते. पण सध्या हीच चित्रपटसृष्टी अत्यंत वाईट कारणामुळे चर्चेत आहे. न्या. हेमा समितीच्या अहवालाने ‘मॉलिवूड’मधील सरंजामी मनोवृत्ती चव्हाट्यावर आणली आहे. एका अभिनेत्रीचा विनयभंग आणि अपहरण केल्याप्रकरणी २०१७ मध्ये ही समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या अहवालात मल्याळम चित्रपटसृष्टीविषयी बरेच धक्कादायक खुलासे करण्यात येत आहेत.

Tags: Actor Sexual AbuseFilmmaker RanjithHema Committee Report
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Siddharth Ray's wife Shantipriya Struggle

तरुण वयातच नवऱ्याला गमावलं, ५४व्या वर्षीही एकटीच राहते सुप्रसिद्ध अभिनेत्री, आता जगत आहे असं आयुष्य

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.