मंगळवार, सप्टेंबर 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘महेश-लक्ष्या’ चित्रपटात एकत्र न दिसल्यानं ‘हा’ चित्रपट ठरला होता फ्लॉप!, स्वतःच शेअर केला किस्सा म्हणाले, “मी म्हणणार लक्ष्या मी आलोच…”

सौरभ जाधवby सौरभ जाधव
एप्रिल 21, 2024 | 8:30 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
‘महेश- लक्ष्या’ चित्रपटात एकत्र न दिसल्यानं 'हा' चित्रपट ठरला होता फ्लॉप!, स्वतःच शेअर केलं किसा म्हणाले, मी म्हणणार लक्ष्या मी आलोच... Laxmikant Berde Mahesh kothare Movie

‘महेश- लक्ष्या’ चित्रपटात एकत्र न दिसल्यानं 'हा' चित्रपट ठरला होता फ्लॉप!, स्वतःच शेअर केलं किसा म्हणाले, मी म्हणणार लक्ष्या मी आलोच... Laxmikant Berde Mahesh kothare Movie

मराठी चित्रपट हे प्रामुख्याने ओळखले जातात त्यांच्या विशेष कथेसाठी. मात्र एक काळ असा होता प्रेक्षक त्यांच्या आवडत्या कलाकारांच्या जोडीला पाहण्यासाठी गर्दी करायचे. प्रेक्षकांची आवडती जोडी पडद्यावर दिसली नाही कि चित्रपटावर फ्लॉप शो ची पाटी देखील त्याकाळी लागायची. मराठी मनोरंजन सृष्टीतील अशाच एका जोडी बरोबर हा किस्सा घडल्याचा पाहायला मिळालं होतं. ही प्रेक्षगाहकांची लाडकी जोडी म्हणजे दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे व अभिनेते दिग्दर्शक, निर्माते महेश कोठारे. अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम करून या दोन अभिनेत्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. आजही या जोडीचे चित्रपट प्रेक्षकांकडून तेवढ्याच आनंदाने पहिले जातात.(Laxmikant Berde Mahesh kothare Movie)

महेश कोठारे यांची त्यांच्या आत्मचरित्रात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबरोबर चित्रपट न केल्याने चित्रपटाला यश आले नाही याबाबतचा एक किस्सा शेअर केला आहे.’जिवलगा’ या चित्रपटात महेश-लक्ष्या ही प्रेक्षकांची लाडकीजोडी न दिसल्याने चित्रपट चालला नाही असं मत दिगदर्शक महेश कोठारे यांचं होतं. एखाद्या जोडीची प्रेक्षकांना इतकी आवड निर्माण झालेली असते कि एक दिसला तर दुसरा नक्की येणार असं त्यांनी गृहीतच धरलेलं असायचं पण ‘जिवलगा’च्या निर्मितीत असं घडलं नाही. पडद्यामागे महेश कोठारे आणि पडद्यावर वर लक्ष्मीकांत बेर्डे पण दोघे एकत्रच न दिसल्याने हा चित्रपट पडला कि काय शाशंका महेश यांनाही होती आणि ती त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे याना बोलून सुद्धा दाखवली.

आणखी वाचा- सहा वर्षांचा संसार मोडला, घटस्फोटानंतर कुशा कपिला कॉमेडियनला करत आहे डेट, सोशल मीडियावर जोरदार चर्चा

‘झपाटलेला’ चित्रपटाच्या तयारीपूर्वी महेश कोठारे लक्ष्मीकांत बेर्डे यांना म्हणाले होते ‘ लक्ष्या प्रेक्षकांना आता फक्त ‘महेश- लक्ष्या’ हेच कॉम्बिनेशन हवं आहे. ‘तू ओरडणार महेश महेश आणि मी म्हणणार लक्ष्या मी आलोच’ हेच ट्युनिंग प्रेक्षकांना बघायचं आहे. त्यामुळॆ आता पुन्हा आपण या कडे लक्ष देऊयात आणि महेश कोठारे यांनी लक्ष्मीकांत यांना झपाटलेलाची कहाणी सांगितली आणि सुरुवात झाली पुन्हा एकदा महेश लक्ष्याच्या जोडीच्या नवीन चित्रपटाची.(Laxmikant Berde Mahesh kothare Movie)

आणखी वाचा- Video : जॉनी लिव्हर यांचा मुलगा व लेकीसह ‘गुलाबी साडी’वर भन्नाट डान्स, चेहऱ्यावरचे हावभाव पाहून सगळ्यांनाच हसू अनावर, व्हिडीओ व्हायरल

या जोडीने एकत्र काम केलेल्या अनेक चित्रपटांनी रुपेरी पडदा गाजवला. ‘दे दणादण’, ‘झपाटलेला’, ‘थरथराट’ अशा अनेक चित्रपटांमधून ही जोडी प्रेक्षकांसमोर आली आणि प्रेक्षकांच्या मनात कायम एक वेगळं घर करून राहिली. चित्रपटाच्या यशाच्या हा फॉर्मुला असू शकतो हे तेव्हा या जोडीने ठळकपणे स्पष्ट करून दाखवलं.

Tags: laxmikant berdemahesh kotharemarathi movie
सौरभ जाधव

सौरभ जाधव

सौरभ जाधव, पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव. पत्रकारिकेचे शिक्षण गुरु नानक खालसा कॉलेज मधून पूर्ण केले असून पत्रकारिता क्षेत्रात पदव्युत्तर पदवी जोशी बेडेकर या कॉलेजमधून संपादन केली आहे. सुरुवातीला जनादेश वृत्तवाहिनी येथे काही काळ काम करून त्या नंतर कलाकृती मीडिया या डिजिटल पोर्टलला लेखक, सोशल मीडिया तसेच कॅमेरा विभागात देखील कामाचा अनुभव आहे. सध्या 'इट्स मज्जा' या पोर्टलमध्ये रिपोर्टर या पदावर कार्यरत आहे. कोणत्याही आवश्यक माहितीसाठी इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Next Post
Aathavi A Webseries success party

'आठवी अ'चा स्नेहसंमेलन सोहळा थाटामाटात संपन्न, कार्यक्रमाला महाराष्ट्रभरातून चाहत्यांची खास उपस्थिती, कलाकारांच्या सादरीकरणाने वेधलं लक्ष

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.