मंगळवार, सप्टेंबर 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘आठवी अ’चा स्नेहसंमेलन सोहळा थाटामाटात संपन्न, कार्यक्रमाला महाराष्ट्रभरातून चाहत्यांची खास उपस्थिती, कलाकारांच्या सादरीकरणाने वेधलं लक्ष

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 22, 2024 | 2:00 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aathavi A Webseries success party

'आठवी अ'चा स्नेहसंमेलन सोहळा थाटामाटात संपन्न, कार्यक्रमाला महाराष्ट्रभरातून चाहत्यांची खास उपस्थिती, कलाकारांच्या सादरीकरणाने वेधलं लक्ष

सध्या सोशल मिडियावर ‘आठवी-अ’ या वेबसीरिजची चर्चा सुरु आहे. केवळ खेड्यापाड्यातून नव्हे तर शहरातूनही या वेबसीरिजला भरभरुन प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे. ग्रामीण जीवनशैलीचं हुबेहूब वर्णन करणारी ही वेबसीरिज अनेकांच्या मनावर राज्य करत आहे. एक भाग संपला की चाहतेमंडळी आगामी वेबसीरिजच्या भागाकडे डोळे लावून बसलेले असतात. ‘आठवी-अ’ वेबसीरिजच्या भरघोस प्रतिसादानंतर नुकताच या वेबसीरिजची सक्सेस पार्टी अगदी थाटामाटात पार पडली. (Aathavi A Webseries success party)

साताऱ्यातील शाहू मंदिर येथे ‘आठवी-अ’च्या या स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण सोहळा अगदी दिमाखात पार पडला. ‘मीडिया वन सोल्युशन्स’ प्रस्तुत, ‘कोरी पाटी’ प्रॉडक्शन व ‘इट्स मज्जा’ ओरिजिनल या वेबसीरिजची मनोरंजन विश्वात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. नुकत्याच झालेल्या या स्नेहसंमेलन सोहळ्यात कलाकारांच्या डान्स व विविध स्किटने अगदी रंगत आणली.

आणखी वाचा – शुभमंगल सावधान! अखेर अमृता बने व शुभंकर एकबोटे अडकले लग्नबंधनात, पुणेरी थाटामाटात उरकला विवाहसोहळा

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

या कार्यक्रमाला सिनेसृष्टीतील कलाकार मंडळीसह अनेक चाहते मंडळी उपस्थित होते. चाहत्यांच्या उपस्थितीवरुन या वेबसीरिजला मिळणारा भरघोस प्रतिसाद पाहायला मिळाला.या कार्यक्रमाला अगदी यवतमाळ, कोल्हापूर, सांगोला येथून चाहतेमंडळी सातारा येथे आले होते. यावरून वेबसीरिजसाठीचे चाहत्यांचे हे प्रेम पाहायला मिळत आहे. अगदी दिग्दर्शक मंडळींसह या वेबसीरिजच्या कलाकार मंडळी व क्रू टीमनेही धमाल, मस्ती केलेली पाहायला मिळाली. सोशल मीडियावरही या धमाल डान्सची झलक प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

आणखी वाचा – “घाणेरड्या भाषेत बोलणाऱ्यांना…”, चिन्मय मांडलेकरने महाराजांची भूमिका करण्यास नकार देताच सिद्धार्थ चांदेकरची संतप्त पोस्ट, म्हणाला…

‘आठवी अ’ या सीरिजची कथा, संवाद व दिग्दर्शन नितीन पवार यांनी केले आहे. तर पटकथा नितीन वाडेवाले व नितीन पवार यांनी लिहिले आहे. या सीरिजच्या प्रत्येक भागाला प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद मिळत आहे. या सीरिजच्या एका भागाला तब्बल १४ लाख व्ह्यूज्स मिळाले आहेत. तर काही भागांनी लाखों व्ह्युजचा टप्पा पार केला.

Tags: Aathavi A Webseries success partyaathvvi aentertainmentmarathi webseries
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Next Post
Chinmay Mandalekar On Trolling

"यापुढे मी महाराजांची भूमिका करणार नाही", मुलांच्या नावावरुन ट्रोल करताच चिन्मय मांडलेकर स्पष्टच बोलला, म्हणाला, "माझ्या कुटुंबाला आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.