सुनील दत्त व नर्गिस यांचा मुलगा संजय दत्तने बॉलिवूडमध्ये त्याच्या अभिनयाच्या जोरावर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. याशिवाय ‘बाबा’ व ‘मुन्नाभाई’ म्हणूनही संजय दत्तची चांगलीच लोकप्रियता आहे. मात्र एक काळ असा होता की, संजय दत्त कायम नशेतच असायचा. त्याच्या त्या दिवसांबद्दल त्यानं जाहीरपणं याआधी अनेकदा सांगितलं आहे. कुल दिसण्यासाठी त्यानं ड्रग्ज घ्यायला सुरुवात केली होती असा खुलासा त्याने याआधी अनेक वेळा केला आहे.
संजयनं रुपेरी पडद्यावर अनेक हिट सिनेमे दिले. परंतु त्याच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये तो अनेक नकारात्मक गोष्टींमुळे तो खूपच चर्चेत होता. संजय दत्तनं त्याच्या आयुष्यात खूप चुका केल्या आहेत. त्यातील सर्वात मोठी चूक म्हणजे त्याला लागलेली ड्रग्ज घेण्याची लागलेली सवय. संजय दत्ताहा व्यसनाच्या इतका आहारी गेला होता की, तो सकाळ, दुपार, संध्याकाळ कायमच नशेत असायचा.
संजय दत्तला इतके व्यसन लागले होते की तो सकाळी उठताच हिरोईन (ड्रग्स) मागायचा आणि अक्षरश: दारुने चूळ भरून गुळणी करायचा. चित्रपट निर्माते महेश भट्ट यांनी एकदा संजय दत्तच्या दारूच्या व्यसनाबद्दल धक्कादायक खुलासा केला होता. महेश भट्ट यांनी आपल्या ट्विटरवर लिहिले होते की, “संजय दत्तला त्याच्या व्यसनाचा सामना करताना खूप त्रास झाला. तो अशा टप्प्यावर पोहोचला होता की, सकाळी उठल्याबरोबर त्याच्या मनात एकच विचार येत होता की, हेरॉइन (ड्रग्स) घ्यायची आहे. संजय दत्त सकाळी डोळे उघडताच दारू पिऊन गुळणी करायचा.”
आणखी वाचा – सासूबाईंचं हृता दुर्गुळेवर आहे जीवापाड प्रेम, सून व लेकाचा रोमॅंटिक व्हिडीओ पाहून म्हणाल्या, “तुम्ही दोघं…”
यासह संजय दत्तनेही एकदा त्याच्या नशेच्या अवस्थेबद्दल खुलासा केला होता की, तो दारू व ड्रग्जच्या आहारी गेला होता. तो दिवसाचे अनेक तास बाथरूममध्ये पडून राहायचा. संजय दत्तने असेही म्हटले होते की, त्याने घेतलेले कोणतेही ड्रग्ज सोडले नव्हते. अमेरिकेतील नशा मुक्ती केंद्रातील डॉक्टरांनी त्याला ड्रग्जची यादी दिली तेव्हा त्याने ते सर्व ड्रग्ज घेतल्याचे म्हटल होते. हे पाहून डॉक्टरांनाही आश्चर्य वाटले.
मात्र, संजय दत्त व्यसनाच्या इतक्या आहारी गेला असूनही त्याने पुन्हा स्वत:वर नियंत्रण मिळवले आणि त्याच्या ड्रग्जच्या व्यसनावर मात केली. त्याने चित्रपटांमध्ये दमदार कमबॅक करून सर्वांना आश्चर्यचकित केले आणि आता संजय दत्त त्याची पत्नी मान्यता व दोन मुलांसह आनंदी जीवन जगत आहे.